जागतिक मातृ सुरक्षा दिनाचे निमित्ताने…

24

 

आई माझा कल्पतरू आई प्रेमाचा सागरतरू”!!
“आई तुझ्यापुढे मी ,आहे अजून तान्हा शब्दात सोड माझ्या हळुच पुन्हा पान्हा !”
“जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी”!
आज मातृ दिवस त्यानिमित्ताने सर्व आदरणीय व पूजनीय आईच्या चरणी सर्व प्रथम पुष्प अर्पण. आईची उपमा मी शब्दात वर्णन करणे मला हे उचित वाटत नाही. आईची महिमा वर्णन काय करावं? कसं करावं? कुठे कराव? कशा प्रकारे करावे? कशा पद्धतीने करावे? यासाठी शब्दरचना काय? मीच नाही तर ,जगातले विद्वान सुद्धा या शब्दाची उपमा व्याख्या महत्त्व सांगायला पूर्ण जिवण जरी याकामी लावले तरी आईची महती सांगुच शकत नाही. एवढं मात्र खरं आहे. आई आहे म्हणून आपण आहो .आई ,बाबा हे आपले प्रथम गुरु आहे आपल्याला भाषा अवगत करणारे प्रथम गुरु आपले आई वडील असतात. बरेच जणांनी जगजननी, कल्पतरू ,आदिशक्ती, महाकाली, दुर्गा ,जगदंबा ,विविध उपमा देऊन आई चे गुण गौतम सांगितले आहे. आपल्या आईची उपमा त्यांनी शब्द रूपात मांडले आहे. आपल्याला नऊ महिने पोटात ठेवून, आपल्याला जन्म देते .म्हणूनच आपण जग पाहू शकतो. आई आपणास लहानपणी तो तोतरी, बोबडी स्वत बोलून प्रथम आपल्याला बोलण्यास शिकवते,चालायला शिकवते, चांगले सुसंस्कात बनवते, चांगले, वाईट काय? हे सांगते. इथूनच आपली पहिली शाळा सुरू व पहिले आई,बाबागुरू असते .आपणास मातृभाषा शिकवीत असते एखाद्या घरातील सर्वात पहिले काळजी करणारी व्यक्ती जर कोणी असेल, तर ते आपली आई .मुलांना जेव्हा सर्वात जास्त दुःख होते ,तेव्हा आईच आपणास विचारते जेवण केला का म्हणून ,तब्येतीची काळजी घेते. उशिरा झाले की, बाळ कुठे गेलता धावू नये.जास्त खेळू नये,अभ्यास कर. आशी शिकवण देणारी आपली आईच आहे.आई आहे म्हणून आपण आहोत आई नसती तर आपण नसतो हे मात्र त्रिकालबाधित सत्य आहे. आईच महात्मे, आईचं वर्णन, मला याप्रसंगी कसं करावं हे शब्दात मांडणे कठीण असलं तरी एक वास्तव मांडण्याचा प्रयत्न मी करत आहे. आई घरातील काम ,थोर पुरुषांची कामे, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत अविरत करत असते. न थकता न कंटाळता .आपली कामे करत असते .आपल्यासाठी ती सतत झटत असते ,सतत आपल्यासाठी चंदनपरी झीजत असते. स्वतःला झिजून सुगंध देणारे आई ही आईच असते.
हल्ली आपण समाजामध्ये पाहतो स्त्रीला, मातृशक्ती मानून आईच्या रूपात बघणारी मंडळी बऱ्याच प्रमाणात आजही आहे. म्हणायचं झाले तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी पर स्त्रीचा आदर मातेसमान केला आहे.असे माझे महान शिवबा व त्यांची आई माता जिजामाता ,सावित्रीबाई फुले ,मदर टेरेसा, इंदिरा गांधी ,कल्पना चावला,माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, एक नाही अशी अनेक उदाहरणे आपल्याला ह्या आईची देता येतील. कोणी राष्ट्रपती झाले .कोणी अंतराळवीर झाले .कोणी शास्त्रज्ञ झाले. कुणी वैद्यकी झाली. कुणी इंजिनिअर झाले. कोणी शिक्षिका झाली .कोणी पोलीस झाले .वकील.न्यायाधीश, सर्व क्षेत्रामध्ये आज स्त्रीने आपलं पदार्पण केलेला आहे. राजकारणापासून तर सरकारी नोकरी. खाजगी नोकरी. लोकसभा अध्यक्षा पासून ते गावातील सरपंच पदावर माझी आई च रूढ झाली आहे, आज पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही, आजची आई ही पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. आजची माझी माता हि 21 व्या शतकातील माता आहे. ऐवढे मोठे योगदान परिवारा सोबतच आपल्या देशासाठी पण योगदान माता देताना पाहत आहे. परंतु या युगातमाता किती सुरक्षित आहे .त्यांच्या सुरक्षिततेची भावना कितपत जोपासल्या जातात, या सुद्धा बघणे नितांत आवश्यकता आहे .काही ठिकाणी लोक सुद्धा या समाजात आपल्या माता सोबत कश्याप्रकारे व्यवहार करतात हे पण पाहतो. त्यांच्या या अन्यायाच्या ह्या गोष्टी आपण रोज ऐकतो, वाचतो, पाहत असतो .परंतु हे घडताना . मनाला वाटते या आईने जन्म दिला. अशा आदिशक्ती स्त्रीरूपी मातेस .आपण पाहण्याचा जर दृष्टीकोन बदलला तर त्यांना . खरी आई म्हणून गौरविण्याचा अधिकार आहे. अशी वागणुक कुठतरी थांबली पाहिजेत. सर्वांनी सर्व स्त्रीला आपली माताच म्हणून बघितले तर बर होईल. अशा घटना होण्यापासून सहज शक्य टाळता येतात.
आई ही आईच आहे, तीची जागा खुद भगवंत ही घेऊ शकत नाही म्हणून मी म्हणतो,
“स्वामी तिन्ही जगाचा ,आई विना भिकारी. ” समस्त आई च्या चरणी नतमस्तक होऊन नमन करतो,
                         आपला मुलगा
           गजानन गोपेवाड
          राज्य समन्वयक
   अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य व अग्निपंख           फाऊंडेशन परिवार महाराष्ट्र राज्य