

✒️कुरुल प्रतिनिधी(नानासाहेब ननवरे)
कुरुल(दि.9नोव्हेंबर):-दि.६ रोजी पंढरपूर तालुक्यातील पोहरगाव येथे भिमा शेतकरी विकास पॅनलचा उमेदवारांच्या प्रचारानिमित्त बोलताना छगन पवार स्वतःचे कारखाने कर्जमुक्त सांगता, आणि मग दराच्या बाबतीत का काटकसर करता? भीमा कारखाना हातातून गेल्यावर झोपलेल्या शेतकऱ्यांच्या डोक्यात दगड घालून लोकनेते कारखाना खाजगी केला हा शेतकऱ्यांचा तळतळाट तुम्हाला लागला आहे. थोरल्याला लोकनेते आहे, धाकट्यासाठी भीमा कारखाना पाहिजे आहे हा दृष्ट हेतू तुमच्या मनात आहे. त्यामुळे सभासद तुम्हाला ओळखून आहेत. त्यामुळे भीमा परिसरातील शेतकरी कधीच मान्य करणार नाही असा घनघात शेतकरी संघटनेचे नेते छगन पवार यांनी केला.
यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले की,मागील निवडणुकीत आम्ही जो जाहीरनामा दिला होता
त्यातील बरीच आश्वासने पूर्ण झाली असून फक्त इथेनॉल प्रकल्प बाकी आहे. त्याचेही काम लवकरच मार्गी लागणार असून बिलाच्या बाबतीत आपण कधीही मागे पडलो नसून,एफआरपीपेक्षा जादा दर दिला आहे.मागील बिलातील आपण दिवाळीला पन्नास रुपये जमा केले आहेत जे पन्नास रुपये राहिले आहेत ते आपल्या खात्यावर शनिवारी जमा होणार असल्याची आनंदाची बातमी उपस्थित सभासद शेतकऱ्यांना यावेळी महाडिक यांनी दिली. यावर्षीही भीमा कारखान्याने २६०० शे रुपये अंतिम दर व २२००रुपये पहिली उचल जिल्ह्यात प्रथम आपण जाहीर केली असल्याचे सांगून, येणाऱ्या १३ तारखेला विरोधकांच्या अफवांवर विश्वास न ठेवता भीमा शेतकरी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्या असे आव्हान यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी केले. यावेळी सभासद,शेतकरी, ग्रामस्थ, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भीमा शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ त्यांनी पोहोरगाव, बठाण, खरसोळी दौरा केला. खरसोळी येथे प्रचाराच्या दरम्यान सभेत ते बोलत होते. यावेळी शिवाजी गुंड, पवन महाडिक, मुबीना मुलाणी, उमेदवार तात्यामामा नागटिळक, बिभीषण वाघ, विलास चव्हाण,अशोक बेद्रे, रमेश बेद्रे ,राजू बेद्रे, हनुमंत बेद्रे, बिभीषण बेद्रे ,संजय घोडके, तात्या घोडके, ज्ञानेश्वर घोडके, विजय कोळी आदी उपस्थित होते.