कामती येथे विधी साक्षरता अभियान अंतर्गत ” हक्क हमारा भी तो है ” या शिर्षकाखाली शिबीर संपन्न

42

✒️कुरुल प्रतिनिधी(नानासाहेब ननवरे)

कुरुल(दि.9नोव्हेंबर):-कायद्याविषयी जागरूकता निर्माण करताना तळागाळातील नागरिकांना आपल्या न्याय हक्काची जाणीव करून देण्यासाठी राष्ट्रव्यापी विधी सेवा शिबिराचा उपक्रम राबिवला जात आहे. कायद्याची माहिती ज्ञात व्हावी या अभियानामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन मोहोळ येथील दिवाणी न्यायाधीश प्र. ग .महाळंकर यांनी कामती येथील कटारे मंगल कार्यालय येथे प्रतिपादन व्यक्त केले.

विधी सेवा समिती मोहोळ ,विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांच्या निर्देशानुसार विधी साक्षरता अभियान अंतर्गत ” हक्क हमारा भी तो है ” या शिर्षकाखाली शिबीर घेण्यात आले .यावेळी विधिज्ञ हेमंत टेकाळे,विधिज्ञ किरण सराटे,विधिज्ञ पुजारी ,विस्तार अधिकारी कुंडलिक गावडे , शिवकुमार आलुर, विधी स्वयंसेवक रामलिंग महामुनी ,विधी स्वयंसेवक राजन घाडगे ,ग्रामविकास अधिकारी राठोड सरपंच रामराव भोसले पाटील ,,आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकांनी मुलीप्रमाणे मुलावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मोबाईच्या मोहाने मुले गुन्हेगारीच्या दिशेने न कळत जातात त्या नंतर पालकांना पश्चताप होतो पालकांनी पूर्व नियोजित पाल्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे तसे न केल्यास पाल्याचे अतोनात नुकसान होते. शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निरापराध्यास शिक्षा होता काम नये अशी प्रचलित म्हण आहे परंतु आता निरापराध्यास न्याय मिळालाच पाहिजे परंतु शंभर गुन्हेगारास शिक्षा झालीच पाहिजे अशी न्याय प्रणाली निर्माण झाल्याचे न्यायाधीश महाळंकर यांनी सांगत विधी सेवा प्राधिकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

विधिज्ञ टेकाळे यांनी लैंगिक अत्याचार व गुन्ह्यात बळी पडलेल्या महिला या संबंधित शासनाच्या विविध योजनेसह मनोधर्य योजनेची महिती दिली व महिलांना कायदे संबंधी मार्गदर्शन केले.
शिबिरासाठी गावातील बाळासाहेब डुबे पाटील ,भोसले गुरुजी ,राजशेखर पाटील ,रामभाऊ भोसले ,गोरख खराडे , अशोक भोसले ,सुरेश कोकरे ,किरण माळी,गणेश माळी ,कुलकर्णी ,प्रमोद लांडे ,तंटामुक्ती अध्यक्ष तायाप्पा गावडे ,शत्रुघ्न जाधव ,खराडे गुरुजी ,संजय तीर्थे ,शिवाजी बाबर ,संदीप अवताडे ,चंदू कोकरे ,प्रकाश पारवे ,सुनील गायकवाड ,संजय वाघमोडे ,अशोक राठोड ,प्रतापसिंह राठोड ,किरण होमकर ,अल्ताफ शेख ,दत्तात्रय खराडे ,संभाजी खराडे ,आदीजण उपस्थित होते. सूत्रसंचालन शिंदे मॅडम यांनी केले यावेळी अशा स्वयंसेविका ,मदतनीस ,गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.