

✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.9नोव्हेंबर):-गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत भगवान चक्रधर स्वामी महाविद्यालय, तळोधी येथे नुकत्याच झालेल्या आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत विविध महाविद्यालयातून महिला व पुरुष कुस्ती पैलवानांनी वेगवेगळ्या वजन गटात सहभाग नोंदवित स्पर्धेत रंगत आणली, त्यात 55 किलो प्रांजली धनजुळे बिए प्रथम वर्ष,, 57 किलो तनु मुकेश जाधव बिए तृतीय वर्ष,, 59 किलो सुचिता रवीन्द्र ठेंगरी बिए तृतीय वर्ष ,,74 किलो गणेश हरिश्चंद्र धनजुळे तृतीय वर्ष,, सर्व ने ही महाविद्यालय ब्रम्हपुरी फ्रिस्टाइल – 70 किलो विनय विलास दिवटे तृतीय वर्ष,,97 किलो लोचन ऊरकुडे प्रथम वर्ष,,ग्रिकोरोमन – 60 किलो पवन सुर्यवंशी प्रथम वर्ष,, 63 किलो रोशन यादव प्रथम वर्ष,, 72 किलो चेतन सुनिल दिवटे तृतीय वर्ष शा शि महाविद्यालय तळोधी (बा.) यांनी प्रथम क्रमांक पटकवित ऑल इंडिया युनिवर्सिटी कुस्ती स्पर्धा( मुली) एस बि पि यु कॉलेज पुणे व शिवाजी युनिवर्सिटी कोल्हापूर (मुले) येथे होत असलेल्या कुस्ती स्पर्धेकरिता निवड झाली असुन वरिल पैलवान ब्रम्हपुरी कुस्ती आखाड्याचे कुस्ती प्रशिक्षक विनोद दिवटे व सह प्रशिक्षक विनित मेश्राम, अमोल ठेंगरी महिला प्रशिक्षक कविता घोरमोडे यांचे मार्गदर्शनात नियमित सराव करीत असून पुढील स्पर्धेत उत्कृष्ट डावाचा प्रदर्शन करून विजय प्राप्त करू असे मानस पैलवानांनी व्यक्त केला.
सर्व पैलवानांचे अभिनंदन करित पुढील स्पर्धेकरिता सुभेच्छा मा प्राचार्य डॉ गहाने सर डॉ सुभाषजी शेकोकर शा शि विभाग प्रमुख,, डॉ गिल मॅडम ,,प्रा प्रशांतजी मेश्राम सर ने हि महाविद्यालय ब्रम्हपुरी, प्रा डॉ राठी सर शा शि महाविद्यालय तळोधी ,,संघटनेचे पदाधिकारी,,संघटक कुस्ती प्रेमी, आई वडील ,,मित्रपरिवार कडुन ग्रामीण भागातील खेळाडू पैलवानांनी अशीच मेहनत करित आयुष्य उज्वल करावे असे मत व्यक्त केले तरी सर्व पैलवानांचे सर्वत्र कौतुक होत आहे.