

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
__________________________
पुसद(दि.9नोव्हेंबर):-अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि शिक्षण मंचाच्या संयुक्त पॅनेलची पुसद येथे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ सिनेट (अधिसभा) पदवीधर मतदारसंघासाठी प्रचार सभा आयोजित केली होती.
उमेदवारांमध्ये खुल्या प्रवर्गातून उत्पल टोंगो, अमोल ठाकरे, रक्षाताई श्रोती, राजेंद्र पांडे, आशिष फुंडकर, तर राखीव प्रवर्ग ओबीसी मधून सुमित पवार, डी. टी. एन. टी. मधून प्रतीक बिडकर, एसी. सी. मधून प्रताप अभ्यंकर, एस. टी. मधून रितेश खुळसाम आणि महिला प्रवर्गातून अनुराधा जळीत यांचा समावेश आहे.
“ठीक करेंगे तीन काम प्रवेश, परीक्षा और परिणाम” हा नारा देत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मागील पाच वर्षा मध्ये जे विद्यार्थीं हिताचे काम केले त्या आधारे अभाविप आणि शिक्षण मंच हि निवडणूक लढवणार आहे, डॉ. स्वप्नील पोतदार सर यांनी सांगितले की विध्यार्थी परिषद गेल्या ७५ वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात रचनात्मक कामांवर विश्वास ठेवून काम करते.
खुल्या प्रवर्गाती उमेदवार उत्पल टोंगो यांनी मतदान करण्याची पद्धत सांगत गत पाच वर्षातील अभाविपच्या सिनेट सदस्यांनी विद्यापीठात केलेले उल्लेखनीय कार्य जसे आदर्श विध्यार्थी पुरस्कार उत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आला, बाहेर गावच्या विद्यार्थ्यांकरिता वस्तीगृहमध्ये निशुल्क निवास व्यवस्था केली गेली तसेच ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल सुरु होऊन 2 पदांची मान्यता मिळवून देण्याचे काम अभाविपच्य सदस्यांनी केले. विदर्भ प्रदेश मंत्री अखिलेश भारतीय यांनी जाहीरनामा सांगत अभाविप व शिक्षण मंचाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आव्हान केले. यावेळी वैभव उबाळे, गोदावरी चक्करवार, नंदू काळे, दीपक परिहार, विनोद जिलेवार, विक्रांत जिलेवार, सीमाताई पापिनवार, अभाविप चे वर्तमान व पूर्व कार्यकर्ते व हितचिंतक उपस्तीथ होते.