

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.9नोव्हेंबर):-येथे नुकतेच काही संघटनांच्या युवकांनी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांतील विद्यार्थी व शिक्षकांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण द्यावे अशी मागणी करून निवेदन दिल्याचे वृत्त वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले होते.या विषयाला महत्व देत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असलेल्या TDRF च्या जवानांनी हि जिल्हापरिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रथमोपचाराचे जिल्हा प्रशासनाकडून प्रशिक्षण देण्यात यावे यासाठी दि. ०७/११/२०२२ रोजी सर्व तालुक्यातील तहसिलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
खाजगी शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापन व प्रथमोपचार या विषयी नेहमीच जनजागृती व प्रशिक्षण तेथील विद्यार्थी व शिक्षकांना दिले जाते. परंतु जि.प. शाळांमध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध असतानाही त्याचे योग्य ज्ञान नसल्याने बरेचदा जीवितहानी किवा शारीरिक हानी त्याठिकाणी होत असते. प्रत्येक शाळेमध्ये प्रथमोपचार पेटी(First Aid Box) उपलब्ध असतो परतू त्यातील साहित्याचा उपयोग माहित नसल्याने विद्यार्थी व शिक्षक त्याचा उपयोग करून योग्य प्रथमोपचार करू शकतील. जर या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रथमोपचाराचे ज्ञान दिल्यास शाळेतच नाही तर समाजात इतरत्र वावरत असताना अशी कोणतीही दुर्घटना घडल्यास किवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास हेच विद्यार्थी व शिक्षक एक जागृत नागरिक म्हणून तेथे मदत करू शकतील सोबतच उपलब्ध असलेल्या साधनांनपासून प्रथमोपचार करू शकतील आणि याचा प्रशासनालाही नक्कीच फायदा होईल.
त्याकरिता जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माद्यामिक शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांना प्रथमोपचार विषयाचे अधिकृत प्रशिक्षक असलेल्या प्रशिक्षकाकडून व प्रशिक्षण संस्थेकडून दोन दिवसीय प्रथमोपचाराचे प्रशिक्षण प्रात्यक्षिकासह देण्यात यावे व प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चाचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती (DPDC) कडे सादर करून तो मंजूर करून लवकरात लवकर प्रशिक्षणाचे आयोजन करावे अशी मागणी TDRF जवानानकडून निवेदनात करण्यात आली. पुसद तालुक्यामध्ये TDRF कंपनी कमांडर पार्थ कोळपे आणि कंपनी DI प्रथमेश खंडापुरे ,रोहन चव्हाण, विकास तोरडमल,आझाद राठोड,सुमित परकटे,अतुल इंगळे, सोहम राठोड,लवकुश पवार,करन आडे,कुष्णा नरवाडे,बादल राठोड,धिरज शिंदे,संंकेत टारटे , काजल राठोड,असमिता राठोड,वैष्णवी पडघणे,मोमु महिंदै , पलक काकडे, इत्यादी TDRF अधिकारी व जवानांनी तहसिलदारांना दिले.