भीमावर लवकरच १.५०लाख लिटरचा इथेनॉल प्रकल्प उभारणार-विश्वराज महाडिक

15

✒️कुरुल प्रतिनिधी(नानासाहेब ननवरे)

कुरुल(दि.9नोव्हेंबर):-रोजी मागील पंचवार्षिक निवडणुकीत साहेबांनी दिलेली आश्वासने जवळजवळ पूर्ण केली आहेत फक्त इथेनॉल प्रकल्प बाकी आहे,१.५० लाख लिटरचा इथेनॉल प्रकल्प लवकरच उभारणार असून यामुळे शेतकऱ्याच्या ऊसाला जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न प्राधान्याने आपण जिल्ह्यात क्रमांक एकचा दर देऊ ,शिवाय कारखाना १५० दिवस उसावर आणि बाकी दिवस मोल्याशीसवर चालू ठेवणार आहे, वर्षातील 300 दिवसा पैकी काही दिवसच कारखाना बंद राहणार आहे त्यामुळे शेतकरी व कामगारांचे हित जोपासण्याचे काम आम्ही करणार आहे,असा शब्द भीमा परिवाराचे युवा नेते तथा पुळुज गटाचे उमेदवार विश्वजीत भैया महाडिक यांनी दिला, काल त्यांनी फुलचिंचोली दौरा केला यावेळी ते दैनिक पंढरीभूषण शी बोलताना सांितले.

भीमा कारखाना हा महाडिकांच्या नावे तर शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे. शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना बंद कसा पडावा यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले. खा.महाडिक यांनी असंख्य संकटाला तोंड देत खंबीरपणे कारखाना सुरू ठेवला. भीमा कारखान्याचा काटा काटेकोरपणे ठेवत कोणताही उपपदार्थ निर्मितीचा प्रकल्प नसताना ऊसाचा दर चांगला देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. संचालक मंडळांनी यंदा निर्णय घेऊन ११ आल्यावर २ हजार ६०० रुपये दर जाहीर केला. विरोधक म्हणतात भीमा कारखाना आमच्याकडे द्या, आम्ही २७०० प्रतिटन दर देतो. मग लोकनेते कारखान्यावर अनेक उपपदार्थ आहेत. कारखाना कर्जात नाही तरीही तुम्ही २७०० दर का देत नाहीत असा परखड सवाल युवा नेते तथा उमेदवार विश्वराज महाडिक यांनी व्यक्त केला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, स्व. भीमराव दादा महाडिक यांनी मोठ्या कष्टाने कारखान्याची निर्मिती केली. मात्र याचा फायदा सभासदांना न होता विरोधकांना झाला. विरोधकांनी भीमा कारखान्याच्या जीवावर आपले कारखाने उभारून वेगवेगळे प्रकल्प उभा केले. मात्र भीमा कारखान्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे येत्या काळात भीमा कारखान्याचा कायापालट केल्याशिवाय आणि स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी उमेदवार विश्वराज महाडिक, संचालक चंद्रसेन बापू जाधव, युवराज चौगुले, परमेश्वर वाघमोडे दिलिप वाघमोडे, आबासाहेब वाघमोडे तानाजी गडदे, प्रशांत वाघमोडे ,महेश वाघमोडे , विशाल मासाळ यांच्यासह कार्यकर्ते, सभासद व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.