

✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि. 9 नोव्हेंबर):- महागाईच्या या काळात स्वतःच पोट सोडून,रक्तविर सेनेच्या विचारधारेचे धागे होऊन जनसेवेत उतरलेले युवक खरच विचार करण्यासारखे आहे.ब्रम्हपुरी तालुक्यात सामाजिक क्रांती घडवून आणण्यासाठी रक्तवीर सेना फाउंडेशन पूर्णपणे प्रयत्नशिल आहे, युवा पिढीला माणुसकी जपणारे विचाराचे धडे देऊन, आज रक्तवीर सेनेने नवा इतिहास केला आहे.
आज तालुक्यातील प्रत्येक गावात रक्तविर सेनेमार्फत रक्तदानाविषयी माहिती प्रचार-प्रसार केली जाते. ज्यात गावातील लोकांना बराच फायदा मिळतो.रक्तदान करणे, शारीरिक दृष्टीने चांगलं आहे हे युवा पिढीने समजावं. ज्या प्रमाणे प्रत्येक व्यक्ति देशाच्या सीमेवर जाऊन रक्षण करू शकत नाही, त्यानंतरचे कार्य म्हणजे रक्तदान आहे.रक्तविर सेनेच्या आदेशाला प्रथम कर्तव्य समजून आज चंद्रपुर गाठतो, उद्या देश गाठून असे आव्हान जिल्हा कार्य सेवक पवन बेदरे यांनी केले व साथीदार रक्तविर शुभम राऊत याला सोबत घेऊन चंद्रपुरला रवाना झाले.
गरोदर रुग्ण वर्षा शंकर सहारे रा. हरदोली ह्या ब्रम्हपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार करत होत्या पण त्यांच्या प्रकृतीचे लक्षण बघता, रक्ताची गरज व उपचार हाताबाहेरच आहे असे बोलत चंद्रपुर ला जाण्याचा मार्गदर्शन ब्रम्हपुरी डॉक्टरांनी केला, व जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे उपचारला हलविण्यात आले. अशात रक्ताची चिंता धरून बसलेल्या रुग्णाची माहिती रक्तविर सेनेला प्राप्त झाली व अवघ्या 15 मिनिटात अध्यक्ष निहाल ढोरे यांच्या मार्गद्शनात, व उपाध्यक्ष मायासिंग बावरी, सचिव प्रदिप दर्वे व तालुका कार्यप्रमुख स्वप्निल राऊत यांच्या संपर्कात राहून रक्तविर सेनेचे जिल्हा कार्य सेवक पवन बेदरे व रक्तविर शुभम राऊत रा. बोंडेगाव यांनी तब्बल तीन दिवस रुग्ण सेवा देऊन रक्तदान केला. व रुग्णाचे जीवन वाचविले.
या कार्यात वेगवेगळ्या मदतीसाठी सहसचिव रूपम शिऊरकार,प्रज्वल जिल्हा कार्य प्रमुख जनबंधू, तालुका निरीक्षक अक्षय खेवले, तालुका नियोजन प्रमुख शिशुपाल बुराडे, सत्यपाल गोठे, सचिन तलमले, गणेश बगमारे,अमोल कुथे, सतिश दर्वे,संदिप कामडी, सागर मेश्राम, प्रविण कुथे,अमोल ठेंगरी,निहाल ठाकरे, मंगेश कोल्हे, कुणाल मेश्राम,हर्षल फाये, तुषार भागडकर,अवतारसिंग जुनी, सतिश बनकर, धिरज नागमोती व इतर रक्तवीरांचे सहकार्य लाभले होते.