शासनाने ई – संजीवनी ऑनलाईन ओपीडी योजनेचा गांभीर्याने विचार करावा

🔹बेकायदेशीर असलेल्या योजनेत डॉक्टरांवर अन्याय?

🔸ई संजीवनी योजनेत रुग्णांच्या जीवाशी खेळला जातो खेळ..

✒️प्रतिनिधी नागपूर(चक्रधर मेश्राम)

नागपूर(दि. 10नोव्हेंबर):-महाराष्ट्र शासनाने मागील दोन वर्षांपासून ई- संजीवनी ओपीडी ऑनलाईन वैद्यकीय उपचार देणारी योजना सुरू केली आहे. यामध्ये शासकीय आरोग्य संस्थेतील डॉक्टर हे कंन्सलटीग पॅनलवर काम करीत असतात. ई संजीवनी कंन्सलटेशन एपद्वारे रुग्ण हा व्हिडिओ काॅलद्वारे होत असलेल्या आजाराच्या बाबतीत डॉक्टरांना माहिती देतो. आणि त्या आधारे शासकीय आरोग्य केंद्रात उपलब्ध असणाऱ्या औषधी लिहुन देतात. तेही शासनाने बंधनकारक केले आहे.

बेकायदेशीर असलेल्या या योजनेचा शासनाने नियुक्त केलेल्या आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गांभीर्याने विचार करावा. असे मत महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना सार्वजनिक आरोग्य विभागाने व्यक्त केले आहे.ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्क सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकत नाही. ई प्रिस्क्रिप्शनची डाऊनलोड केलेली चिट्टी घेऊन शासकीय आरोग्य केंद्रात जाण्यापेक्षा त्या केंद्रातील उपलब्ध असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रत्यक्षपणे दाखविणे योग्य ठरेल.रुग्णालयात न येताही आणि डॉक्टरांनी रूग्णांची तपासणी केली नसतानाही औषध लिहून देणे हे बेकायदेशीर आहे तरीही झोपेत असलेल्या शासनाने ही योजना सुरु ठेवून रुग्णांच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे.

काही वर्षापूर्वी न्यायालयाने एका वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरला दंड केला होता. ग्रामीण व दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत पॅनलवर असलेल्या डॉक्टरला मुंबई येथे कार्यालयात गैरहजर असल्याची नोंद केली जाते. आणि पगार कपातीची शिक्षा विनाकारण डॉक्टरांना भोगावी लागते. अशा बेकायदेशीर असलेल्या ई संजीवनी ऑनलाईन ओपीडीमुळे रुग्णाला काही दुष्परिणाम झाल्यास शासन जबाबदार राहणार का? असा गहन प्रश्न उपस्थित केला जात आहे. रुग्णांच्या जिवाशी खेळ खेळल्या जाणाऱ्या या योजनेचा आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गांभीर्याने विचारपूर्वक अभ्यास करून ही योजना तात्काळ बंद करण्याचे पाऊल उचलावे. अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने शासनाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले आहे.

नागपूर, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED