स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाच्या निर्णयाचे नायगावात पेढे वाटून स्वागत

54

✒️नायगाव,ता.प्रतिनिधी(चांदू आंबटवाड)मो:-९३०७८९६९४९

नायगाव(१० नोव्हेंबर):-महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर जसे अंदाजे १९८२ साली अदिवासी विभाग मंत्रालय स्वतंत्र करण्यात आले तद्नंतर सन १९९९ मध्ये महिला व बालकल्याण विभाग वेगळा करण्यात आला, पुढे सन २०१८ साली विमुक्त जाती भटक्या जमाती, ईतर मागास वर्ग व बहुजनांच्या कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली होती, त्याच धर्तीवर दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय व्हावे ही मागणी गेली.

१५ ते २० वर्षांपासून दिव्यांगांचे कैवारी मा.राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी लावून धरली होती व काल झालेल्या विधीमंडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच दिव्यांगांसाठी वेगळे मंत्रालय करणार असून त्या माध्यमातून महाराष्ट्रातील दिव्यांगांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न राहील आणि नविन मंत्रालयाच्या माध्यमातून दिव्यांगांच्या अनेक समस्या मार्गी लागतील. तसेच प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन व दिव्यांग पुनर्वसन केंद्र तयार केले जाणार असून त्याचा नोंदणीकृत दिव्यांगांना लाभ मिळणार आहे तसेच शेड्युल काँस्ट च्या धर्तीवर युनिक आय डी कार्डची अमलबजावणी होणार आहे.

एकही दिव्यांग बांधव शासकीय योजनेपासून वंचित रहाणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. अदिवासी विकास महामंडळाच्या धर्तीवर दिव्यांगांना स्वतंत्र मंत्रालय ही घोषणा होताच नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे प्रहार दिव्यांग संघटनेचे नायगाव तालुका अध्यक्ष श्री साईनाथ बोईनवाड व संपूर्ण दिव्यांग बांधवांनी शासनाच्या निर्णयाचे फटाके फोडून, गुलाल उधळून व पेढे वाटून जल्लोषात स्वागत केले .