रामेलेक्स प्रा. लि. ला विद्युत विभागा मधून भारतातील पहिले ZED गोल्ड प्रमाणपत्र प्रदान

111

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.11नोव्हेंबर):- शिवणे इंडस्ट्रीज असोशिएशन आणि रामेलेक्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने लघु आणि मध्यम उद्योगांसाठी केंद्र सरकारच्या झीरो डीफेक्ट, झीरो इफेक्ट ( ZED)  प्रमाणपत्र बाबत माहिती आणि मार्गदर्शनचे आयोजन आज करण्यात आले होते. या संवादाच्या माध्यमातून उद्योजक, शासन व प्रशासन यांची सांगड सांगड घालता आली, या संवादा मुळे उद्योग वाढीसाठी हातभार लागणार आहे असे प्रतिपादन राज्याच्या उद्योग विभागाचे संचालक सदाशिव सुरवसे यांनी केले. 

विद्युत विभागा मधून झीरो डीफेक्ट, झीरो इफेक्ट (ZED) गोल्ड प्रमाणपत्र  मिळविणारी भारतातील पहिली कंपनी असलेल्या रामेलेक्स प्रा. लि. त्यांचे प्रमाणपत्र देण्यासाठी रामेलेक्स ऑडोटोरियम हॉल, शिवणे येथे  आयोजित विशेष कार्यक्रमात राज्याच्या उद्योग विभागाचे संचालक सदाशिव सुरवसे  बोलत होते. या प्रसंगी Ministry OF MSME and QCI चे विरेन्द्र इंगळे आणि युवराज जांभळे ZED प्रमाणपत्रांचे महत्व आणि आवश्यकता या विषयावर विशेष मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामेलेक्स प्रा. लि. चे चेअरमन राम बाबारावजी जोगदंड होते. हा विशेष सोहळा अखिल अरुण घोंगरे (जॉइंट डायरेक्टर इंडस्ट्रीज हेल्थ अँड सेफ्टी), रामराव वाघ (आयपीएस), डी. एस. हाके (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वारजे), चंद्रशेखर मोरे (मॅजिक स्ट्रक्चर शिवणे), संजय भोर (अध्यक्ष शिवणे इंडस्ट्रीज असोशिएशन), अविनाश माणिकराव जोगदंड ( उपाध्यक्ष, शिवणे इंडस्ट्रीज असोशिएशन ) यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पुढे बोलताना सदाशिव सुरवसे म्हणाले की, लघु व मध्यम उद्योजकांसाठी राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. त्यांची माहिती उद्योजकांपर्यंत पोहचवण्यासाठी अशा संवादाची गरज आहे. शिवणे इंडस्ट्रीज असोशिएशन आणि रामेलेक्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेला हा उपक्रम उद्योजकतेला पुढे घेऊन जाणारा ठरणार यात शंका नाही. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना रामेलेक्स प्रा. लि. चे चेअरमन राम बाबारावजी जोगदंड म्हणाले की, एमएसएमई उद्योजकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मद्ये ZED ही संकल्पना आणली. या प्रमापत्रासाठी ठेवण्यात आलेली पात्रता मिळविणे फारसे अवघड नाही, पहिला टप्पा सहज पार करता येतो, त्यानंतर काही कठीन पातळी असल्या तरी ब्रॉन्झ किंवा सिल्व्हर या पैकी एक साध्य करणे अशक्य नाही.  रामेलेक्सला ZED गोल्ड प्रमाणपत्र मिळवून देण्यात आमच्या सर्व अधिकारी, सल्लागार व कामगारांचा मोठा वाटा आहे. करोनापूर्वी या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती व त्याहीवेळी आम्ही भारतामधून QCI चे WASH certificate मिळवणारी प्रथम कंपनी होतो ज्याचा आम्हास हे भारतातून विद्युत विभागातील प्रथम गोल्ड झेड प्रमाणपत्र मिळविण्यास मदत झाली. आम्हाला वाटते की शिवणे इंडस्ट्रीज मध्ये असलेल्या 350- 400 युनिट्स मध्येही झेड प्रमाणपत्र मिळणारे उद्योग तयार व्हावेत कारण त्याचे फायदे भरपूर आहेत. भारतातील उद्योगांची विश्वासहर्ता वाढून निर्यात वाढण्यास याचा उपयोग होणार असल्याचेही जोगदंड यांनी नमूद केले. 

चंद्रशेखर मोरे यांनी जुन्या उद्योगांच्या समस्यांची सविस्तर मांडणी करत सरकारने त्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. तसेच औद्योगिक विभागातील उद्योजकांना सुद्दा राष्ट्रीय बॅंका कर्ज नाकारताहेत आणि त्यांना चढ्या दराने कर्ज घ्यावी लागत आहेत. औद्योगिक क्षेत्र असूनही त्या क्षेत्राचा एन ए का मागितला जातो हा एक मोठा प्रश्न निर्माण होऊन महापालिकेचा मिळकत कर लहान व लघु ऊद्योगांच्या आवाक्या बाहेर झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अविनाश माणिकरावजी जोगदंड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामेलेक्स प्रा. लि. चे संचालक अविनाश जोगदंड, सोनल भाटे,  हृषीकेश भिसे, आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केले. यावेळी शिवणे ईंडस्ट्रीज असो. चे अध्यक्ष व कार्यकारणीतील सदष्यासहित साधारण १०० पेछा जास्त उद्योजक उपस्थित होते.रघुवीर जोशी व रुपेश यादव यांनी हा कार्यक्रम ऑर्गनाइज करण्यासाठी व यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य केले.