मन्नाथ सेवा मंडळाकडून स्वखर्चातून श्रीक्षेत्र मन्नाथ मंदिर पायाभरणीचा संकल्प पूर्णत्वाकडे

14

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.11नोव्हेंबर):-शहरालगतच्या मरगळवाडी येथील जागृत देवस्थान असलेल्या श्रीक्षेत्र मन्नाथ मंदिराच्या जिर्णोद्धारात शहरातील सेवानिवृत्त अधिकारी- कर्मचारी, डॉक्टर, वकील, पत्रकार व होतकरू नागरिकांचा समावेश असलेल्या मन्नाथ सेवा मंडळाने स्वखर्चातून मंदिराच्या पायाभरणीचा आदर्श व स्तुत्य उपक्रमाचे तालुक्यात कौतुक होत आहे.शहरानजिकच्या मन्नाथ मंदिराचा जीर्णोद्धार मरगळवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह अनेक नेते, पुढारी यांच्या भरघोस आर्थिक मदत होत आहे. आपल्या जागृत देवस्थानाच्या जीर्णोद्वारात आपलाही खारीचा वाटा असावा या उदात्त हेतूने मन्नाथ सेवा मंडळाच्या सदस्यांनी एकत्रितपणे साधारणता ५ लक्ष रुपये अपेक्षित खर्च असलेल्या मजबुतीकरणासह पायाभरणीचा संकल्प करून तो पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

मन्नाथ सेवा मंडळाच्या या उपक्रमात मंडळाचे अध्यक्ष प्रतापसिंह ठाकुर, निवृत्त शिक्षणाधिकारी शंकरराव वाघमारे, निवृत्त प्राचार्य विश्वनाथ सोन्नर, माजी सहा.सरकारी अभियोक्ता नंदकुमार काकाणी, माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, पत्रकार प्रमोद साळवे व रमेश कातकडे, सिमेंटचे व्यापारी संजय बर्वे, निवृत्त केंद्रप्रमुख संभाजी वाडेवाले, डॉ.बालासाहेब मानकर, ॲड.मनोज काकाणी, केंद्रप्रमुख विठ्ठलप्रसाद पवार, मुख्यध्यापक रावसाहेब कातकडे, भागवतराव भोसले, लॉयन्सचे अध्यक्ष कुबेर खांडेकर, शेषराव सरोदे, मुख्याध्यापक गोविंदराव जाधव, बालाजी लांडगे, डॉ.धनंजय लटपटे, डॉ.निळकंठ लटपटे, डॉ.प्रफुल्ल ठाकूर, सेवानिवृत्त तलाठी विठ्ठलराव दहिफळे, मुख्याध्यापक प्रकाश मुंडे, मंगेश मुंडे, प्रदीप बिडवई, गोविंदराव निरस आदींसह अन्य मन्नाथ भक्तांनी याकामी योगदान दिले. तसेच शहरातील नामांकित इंजिनियर राम मुरकुटे यांनीही याकामी विना मोबदला आपले योगदान देत आहेत.