राजकारणात कम्पेन्सेशन लोकशाहीला मारक!

14

आमदार मेला.त्याच्या जागेवर बायकोला,मुलाला,सुनेला उमेदवारी देणे.बायको मेली.तिच्या जागेवर पतीला ,मुलाला, सुनेला उमेदवारी देणे चुकीचे आहे.जो आमदार होता किंवा होती,ते त्यांचे विधानसभेतील प्रतिनिधीत्व होते.ते वारसाहक्काने नको म्हणूनच लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया राबवली जाते.जेणेकरून संपत्ती च्या मालकीचा हक्क वारसाहक्काने सातबारा वर लावणे टाळता आली पाहिजे.अजूनही आमदारकी, खासदारकी म्हणजे जहागिरी समजली जाते.ते मेल्यानंतर वारसाला दिली जाते.असे करणारे पक्ष लोकशाही वादी नाहीतच.हे लोकशाही ला मान्य नाही.कारण यामुळे राजकिय कार्य लोप पावते.कर्तुत्व लोप पावते.सत्ता एकवटते.

सरकारी नोकरीत तसा गैरप्रकार आहे.अनुकंपा.कर्मचारी मेला तर म्हणे कुटुंब आर्थिक दृष्टीने कोलमळते.हो कोलमळते.तर मग,जे लोक सरकारी नोकरी करीत नाहीत,आणि त्याचा नोकरीचा बाप किंवा आई मेली.तर तो जगत नाही का?बाप आणि आई मरण्याची घटना निरंतर आणि सर्व कुटुंबात होते.तर ते जगत नाहीत का? अनुकंपा मुळे आम्ही सरकारी नोकरीचे उदिष्ट कुंठीत करतो.गमावतो.नुकसान करतो.म्हणून सरकारी संस्था डबघाईस येऊन खाजगी संस्था वाढत आहेत.खाजगी संस्थामधे असे अनुकंपाचे थोतांड नाही.तसाच प्रकार आता राजकारणात सुरू आहे.तो अयोग्य ् आहे.

अनेक उदाहरणे आहेत कि अनुकंपा वर सहानुभूती म्हणून जे आमदार खासदार झाले ते जनतेच्या हिताचे ठरले नाहीत.लोकशाही ला अपेक्षित घडले नाही.वंशावळीने सत्ता नको आहे म्हणूनच लोकशाही स्विकारतो.नाहीतर बाबर नंतर औरंगजेब पर्यंत ,बाळाजी विश्वनाथ बल्लाळ नंतर दुसरा बाजीराव पर्यंत हे चालतच राहाणारे आहे.जळगांव जिल्ह्यातील कांग्रेस जिल्हा अध्यक्षांचे मेरीट विचारले तर उत्तर मिळाले,म्हणे यांचे आजोबा कांग्रेस मधे होते, वडिल कांग्रेस मधे होते.जरी अध्यक्ष बारा पर्यंत दारूत बुडून कांग्रेस चे बारा वाजवले तरी चालते.वारसाहक्काने कांग्रेस संघटना चालवली जात असल्याने लोकांच्या नजरेतून उतरली.सत्तेबाहेर फेकली गेली.तोच प्रकार शिवसेनेत.तोच प्रकार राष्ट्रवादीत.

जळगाव जिल्ह्यातील जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक.तेथे जे धेंडे संचालक, चेअरमन होती,त्यांचीच औलाद पुन्हा संचालक व चेयरमन साठी उमेदवार दिले.आम्ही जागृत जनमंच ने त्यांना विरोध केला.नवीन उमेदवार देऊन सवतसुभा केला.तेव्हा जुन्या धेंडांना कळले कि जळगाव जिल्हा जागृत झाला आहे.अनेक राजकीय चोरांना घाम फुटला.आताही दूध फेडरेशन संचालक साठी जुनी चोर मंडळी उमेदवारी करीत आहेत.आमचा विरोध आहे.आधीच यांनी दूध नासवले,लोणी नासवले,तूप नासवले.फक्त नासवले नाही,नासवले असे खोटे खोटे भासवले.ते गोडबंगाल आताच उघडकीस आले.कसे? आधीचे संचालक मंडळ बरखास्त करून नव्या दमाचे संचालक नेमले.एकाच महिन्यात चोटाळा शोधून बाहेर काढला.घोटाळा नव्हे कोथळा.पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.ज्यांचा कोथळा बाहेर काढला ते अफझलखान पुन्हा संचालक पदासाठी उमेदवारी करीत आहेत.अगदी म्हसणात गवऱ्या गेल्या तरीसुद्धा.अशा चोरांना,धेंडांना नवीन लोकांनी शह दिला पाहिजे.उमेदवारी केली पाहिजे.आणि शेतकऱ्यांचे चांगले दूध पाय घालून नासवणाऱ्या या नासलेल्या बुद्धीच्या चोरांना संचालक पदावरून हाणून पाडले पाहिजे.आम्ही तरूणांना आवाहन करतो,या चोरांच्या थैल्या किती दिवस सांभाळणार आहात?जर तुम्हाला संधी देतच नसतील तर यांना लत्ताप्रहार करा.यांच्या छातीवर उमेदवारी करा.हारले तरी चालतील पण एकदा महाराणा प्रतापसिंह यांचे अनुकरण तर करा.पुढे तुम्हीच छत्रपती होऊ शकतात.

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच,जळगाव