राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ३ कोटी २६ लाख नुकसान भरपाई वसूल

48

🔸१५८४ प्रकरण आपसी तडजोडीने निकाली

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.13नोव्हेंबर):- जिल्ह्यात आज आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये १०२८ प्रलंबित व ५५६ दाखल पूर्व प्रकरण आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. तसेच मोटार अपघात प्रकरणांमध्ये तीन कोटी २६ लाख २३ हजार रुपये नुकसान भरपाई वसूल करण्यात आल्याची माहिती विधीसेवा प्राधिकरणचे सचिव न्या. सुमित जोशी यांनी दिली.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर मार्फत जिल्हा व तालुका न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र

न्यायाधीश समृध्दी एस. भीष्म यांच्या मार्गदर्शनानत आज करण्यात आले होते. लोकअदालतीच्या यशासाठी सर्व न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी व पोलीस यांनी परिश्रम घेतले.

यशस्वी प्रकरणातील पक्षकारांना भेट म्हणुन झाडाचे रोप देण्यात आले.