गुगवाड येथे लोटला लाखोंचा भीमसागर ; ‘धम्मभूमी’ लोकार्पण सोहळा प्रचंड उत्साहात संपन्न

13

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.13नोव्हेंबर):-गुगवाड,ता.जत,जि. सांगली येथे चंद्रकांत रामचंद्र सांगलीकर या उद्योजकाने अथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्ट,गुगवाड च्या माध्यमातून 13 कोटी रुपये धम्मदान स्वखर्चाने निर्माण केलेल्या ‘धम्मभूमी’ (बुद्ध विहार) चे लोकार्पण सोहळा 12 नोव्हेंबर रोजी पूज्य भिख्खू संघ याचे हस्ते लाखो अनुयायांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी सकाळी पूज्य भिख्खू संघाचे हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून पूज्य भदन्त डॉ.उपगुप्त महाथेरो पुरणा बुद्ध विहार जि. नांदेड व पूज्य भिख्खू संघाचे हस्ते फित कापून ‘धम्मभूमी'(बुध्द विहार)चे उदघाटन करून लोकार्पण करणेत आले यानंतर धम्मरेंलीचे आयोजन करणेत आले होते.

पूज्य भिख्खू संघ यांच्या हस्ते बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करणेत आली धम्मपीठावर स्वागत गीत होऊन उपस्थित उपासक उपासिका यांना क्षमायाचना व त्रिशरण व पंचशील देणेत आले.

उद्योगपती सी.आर.सांगलीकर यांच्या हस्ते स्वागत व प्रास्ताविक करणेत आल्यानंतर आलेल्या उपासक उपासिका व धम्मबांधव यांना बौद्ध धम्माची धम्मदीक्षा देऊन दीक्षा समारंभ पार पाडण्यात आला.पूज्य भदन्त धम्मसेवक महाथेरो,,पूज्य भदन्त बोधीपालो महाथेरो,पूज्य भदन्त डॉ.उपगुप्त महाथेरो,पूज्य भदन्त सत्याणंद महाथेरो,पूज्य भदन्त डॉ. खेमधमो महाथेरो,पूज्य भदन्त बोधिरत्न महाथेरो,पूज्य भदन्त डॉ.यश कश्यपायन महाथेरो,पूज्य भदन्त सत्यशील महाथेरो,पूज्य भदन्त इंदवस महाथेरो,पूज्य भदन्त डॉ. सत्यपाल महाथेरो यांनी उपस्थित उपासक उपासिका यांना धम्मदेसना दिली.

यावेळी उद्योगपती सी.आर.सांगलीकर यांनी ठराव वाचन केले व धम्मपालन गाथा घेणेत आल्यानंतर आलेल्या सर्व पुज्य भन्तेजी आणि पुज्य भिख्खू संघ यांना चिवरदान देणेत आले.या ‘धम्मभूमी’ लोकार्पण सोहळ्यास महाराष्ट्रास आंध्रप्रदेश, कर्नाटकातील धम्मबाधवांची उपस्थिती लक्षणीय होती.धम्मबांधव येताना स्वयंप्रेरणेने येताना दिसत होते गाडीला पंचशील ध्वज,निळा ध्वज लावलेला,जयभीमचा गजर करत ‘धम्मभूमी’ परिसरात धम्मबांधवांचे आगमन होताना दिसत होते.येणाऱ्या धम्मबांधवांच्यात उत्साह इतका प्रचंड होता की ‘धम्मभूमी’ परिसरात धम्ममय वातावरण पाहायला मिळत होते तथागत गिउम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावांनी जयघोष करत अनुयायी ढोल ताशांच्या गजरात ‘धम्मभूमी’ परिसरात आगमन करत होते छोट्या मोठ्यापासून अबाल वृद्धाची उपस्थिती लक्षणीय होती सर्वांच्या तोंडी तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव करतानाचे चित्र होते.

‘धम्मभूमी’ (बुद्धविहार) पाहून धम्मबांधव समाधान व्यक्त करत होते आम्हाला इथे येऊन पावन झाल्याचे बोलताना काही धम्मबांधव सांगत होते.या लोकार्पण सोहळ्याचे नियोजन इतके चोख होते की आलेल्या धम्मबांधवांना कोणत्याही प्रकारची गैरसोय जाणवली नाही.प्रशस्त पार्कींगची व्यवस्था करणेत आली होती.यावेळी आलेल्या सर्व धम्म अनुयायांची लंगर मध्ये जेवणाची व्यवस्था चोख करणेत आली होती. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने अनुयायी तथागताचे दर्शन घेताना दिसत होते.लोकार्पण सोहळ्यास आलेले आनुयायांनी उद्योग पती सी.आर.सांगलीकर आणि अथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्ट, गुगवाड याचे आभार मानले.