🔹तालुका काँग्रेस कमिटी यांचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तहसीलदार पोंभुर्णा मार्फत निवेदन

✒️पोंभुर्णा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पोंभुर्णा(दि-10जुुुलै):- मुंबई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला यात राजगृहाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली मुंबई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृहावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ अटक करून कारवाई करण्यात यावी याचे निवेदन तालुका काँग्रेस कमिटीतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तहसीलदार साहेब यांच्या मार्फत देण्यात आले.

मुंबई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह आहे हे राजगृह या देशातील तमाम आंबेडकरी जनतेचे श्रध्दास्थान आहे राजगृह या देशाच्या ऐतिहासिक वारसा असून या ऐतिहासिक वारशाला काही जातीयवादी व समाजकंटकांनी राजगृहाची तोडफोड केली पुरोगामी महाराष्ट्राला ही घटना न शोभणारी असून यामुळे देशातील तमाम आंबेडकरी जनतेच्या भावना मोठ्या प्रमाणात दुखावल्या त्यामुळे संपूर्ण आंबेडकरी जनतेत असंतोषाची लाट पसरलेली असून राजगृहावर हल्ला हल्ल्याचा तालुका काँग्रेस कमिटी निषेध केला आहे राजगृहाची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांनी वर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे तालुका काँग्रेस कमिटी कडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पोंभूर्णा येथे आंदोलनही करण्यात आले घोषणा देण्यात आल्या व त्यानंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष कवडु कुंदावार, अतिक अहमद कुरेशी नगरपंचायत पोंभूर्णा गटनेता जयपाल गेडाम सविता गेडाम नगरसेविका, अमर सिंग बघेल नगरसेवक तेजराज मानकर रिपब्लिकन नेता, पराग मुलकलवार, भीमराव गणवीर, चिंधुजी बुरांडे, अशोक सिडाम, विलास कामिडवार, शरद पोलोजवार, मारुती धोटे, मनोहर वनकर, विजय वासेकर अशोक गेडाम इत्यादी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

महाराष्ट्र, मागणी, विदर्भ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED