बुद्धम शरणम गच्छामी चा नाद कान्हेरी बुद्ध लेणीत घुमला

17

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.14नोव्हेंबर):-लेणी संवर्धक वकील संघ, पुणे यांचे विद्यमाने कान्हेरी बौध्द लेणी, बोरिवली याठिकाणी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते,यावेळी कार्यशाळेत ४५ वकील बंधू भगिनींनी सहभाग घेतला.लेणी संदर्भात जणजागृती व संवर्धन करण्याची प्रेरणा घेवून ऐतिहासिक वारसा जपण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. सदर कार्यशाळेत धम्मलिपि तज्ञ, लेणी अभ्यासक सुनिल खरे ,नाशिक यांना मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते, त्यांनी कान्हेरी लेणीची माहिती दिली तसेच येथील शिलालेख वाचन करून दान दात्यांची नावे पण सांगितली, पाण्याचे शुद्धीकरण करण्याची पध्दत आपल्याला कान्हेरी बुद्ध लेणी मधील स्थापत्यकलेतून दिसून येते.

नाशिकच्या व्यापाऱ्याने दान दिल्याचा शिलालेख ह्या ठिकाणी असून त्याचे वाचन व लिप्यातर करण्यात आले,

सदर कार्यशाळेत ॲड. राजेश नितनवरे, ॲड. रविंद्र वाघमारे, ॲड. अक्षय ननावरे, ॲड. वैभव धनकुडे, ॲड. श्रीनिवास खुंटे, ॲड. मुकुंद ओव्हाळ, ॲड. लक्ष्मण जगधने, ॲड. सुजीत रणधीर, ॲड. विशाल पारवे, ॲड. कुंडलिक वाघमारे, ॲड. कैलास अहिवळे, ॲड. राजरत्न शाक्य, ॲड. प्रविण अहिरे, ॲड. भिवराज रणखांबे, ॲड. संभाजी वाघमारे, ॲड. प्रियंका खंडागळे, ॲड. प्रतिभा शाक्य, ॲड. श्रीजीत कदम, ॲड. सुभाष म्हस्के, ॲड. कार्तिक शिवशरण,अॅड शितल भोसले ॲड. पुर्णज्योती, ॲड. मिलींद घोगरे अॅड मल्लिकार्जुन शाक्य , अॅड संजय गायकवाड , प्रमिला गायकवाड , शुद्धोधन बागडे, मिराताई वाघमारे, वैशाली शाक्य , जीवन, गायकवाड,कामेश साळवे सह अनेक बांधव वकील सहभागी होते.

यावेळी उपस्थित सर्व वकील बांधवांना अशोक कालीन धम्मलिपिची वर्णमाला सेट दान पारमिता फाउंडेशन तर्फे भेट देण्यात आले,आयोजकांनी चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था कार्यशाळेत सहभागी उपासकांसाठी केलेली होती,सदर कार्यशाळेचे आयोजन ॲड. अजय विलास डोळस, ॲड. राहूल गौतम ढाले, ॲड. सुमेध सुदाम घनवट यांनी केले.