जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोदानगर येथे विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप

97

✒️नासिक प्रतिनिधी(विजय केदारे)

नाशिक(दि.15नोव्हेंबर):-निफाड तालुकयातील गोदाकाठ मेडिकल असोसिएशन सायखेडा यांनी गोदानगर प्राथमिक शाळेत सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार स्वेटर वाटप करण्यात आले.गोदाकाठ मेडिकल असोसिएशनने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोदानगर येथे भेट देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या. शाळेचे मुख्याध्यापक श्री. नवनाथ सुडके यांनी हिवाळा ऋतू सुरू झाल्याने येथील विद्यार्थ्यांना थंडीपासून बचावासाठी स्वेटरची आवश्यकता असल्याचे सांगितले.मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नितीनजी गिते यांनी स्वेटर देण्याचे तत्काळ मान्य करत त्याची पूर्तताही असोसिएशन माध्यमातून केली.

आज शाळेतील सर्व १०१ विद्यार्थ्यांना दर्जेदार स्वेटर वाटप करण्यासाठी अध्यक्ष डॉ. नितिन गिते, उपाध्यक्ष डॉ. सुनिल वाघ, डॉ.उत्कर्ष शिंदे उपाध्यक्षा डॉ. रोहिणी घुगे, सचिव योगेश केकाण असोशिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.स्वेटर वाटप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. नितीन गिते होते. प्रमुख अतिथी म्हणून सायखेडा ग्रामपालिका सदस्या शोभा डंबाळे, मल्हारी गायकवाड हे होते.विद्यालयाच्या वतीने मेडिकल असोसिएशनच्या सर्व डॉक्टरांचे स्वागत विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देऊन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. नवनाथ सुडके यांनी केले.

असोसिएशन च्या उपाध्यक्षा डॉ.रोहिणी घुगे यांनी आम्ही दिलेल्या स्वेटरचा उपयोग जसा ऊब येण्यासाठी होईल तशीच शैक्षणिक गुणवत्तेची ऊब सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये जागृत असणे आवश्यक आहे. तसेच असोसिएशन चे सचिव डॉ. योगेश केकान यांनी गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना मदतीसाठी हे मेडिकल असोसिएशन कायम कटिबध्द असल्याचे नमूद करत गोदानगरच्या विद्यार्थ्यांसाठी योग्य ऋतूत योग्य मदत केल्याने समाधान वाटते असे नमूद केले. अध्यक्ष डॉ. नितीन गिते यांनी सांगितले की, सामाजिक भावनेतून हे मेडिकल असोसिएशन काम करत असून गोदानगर शाळेतील मुख्याध्यापक श्री. नवनाथ सुडके हे अतिशय संवेदनशील आणि उपक्रमशील असून त्यांना साथ देणारे त्यांचे सहकारी स्मिता लांडे – सुडके, ताईबाई कोकाटे, सोमनाथ महालपुरे यांच्या कामाचेही कौतुक डॉ.गिते यांनी केले.

या कार्यक्रम प्रसंगी डॉ.तुषार घुगे, डॉ.अनिल बोऱ्हाडे,डॉ. दगुजी हाडपे, डॉ. हेमंत दळवी, डॉ. अनिल महाजन, डॉ. शरद दळवी, डॉ.प्रशांत कांडेकर,डॉ.संजय मत्सागर,डॉ. सुमंत दीक्षित, डॉ. सुभाष पिंगळ,डॉ.विक्रांत वाघ,डॉ.योगेश केकाण, योगेश पगारे आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मल्हारी गायकवाड, शोभा डंबाळे शिक्षक ताईबाई कोकाटे, सोमनाथ महालपुरे यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार स्मिता लांडे – सुडके यांनी मानले.