तलवाडा येथे मानविहक्क अभियान व डि. पी. आयच्या वतीने संयुक्तरित्या जयंती व बालदिन साजरा

34

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

गेवराई(दि.15नोव्हेंबर):-तालुक्यातील तलवाडा येथे दि.१४ सोमवार रोजी तलवाडा साठे नगर येथे क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे जयंती व बालदिन मानविहक्क अभियान व डि. पी. आयच्या वतीने संयुक्तरित्या साजरा करण्यात आला. क्राँती गुरु लहुजी ऊस्ताद साळवे जयंती व बाल दिनानिमित्त शालेय विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पंचायत समिति सदस्य प्रा. श्याम आबा कुंड सर तर प्रमुख पाहुणे म्हणून तलवाडा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पीएसआय मोहन राठोड साहेब, जिल्हा परिषद सदस्य युवराज तात्या डोंगरे, संत रोहिदास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तुळशीराम (दादा) वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य किशोर हात्ते, पत्रकार विष्णू राठोड, नजीर भाई कुरेशी, गणेश काळे, नाटकर सर, ग्रामपंचायत सदस्य गणेश महाराज कचरे, शिवसेना सर्कल प्रमुख रफिक शेख, ग्रामपंचायत सदस्य आप्पा हातागळे, ग्रामपंचायत सदस्य शहादेव साबळे, शेतकरी संघटनेचे बाळू शिंगारे, संजय हातागळे, बाप्पुराव रोकडे, वामन (दादा) रोकडे, लालाभाऊ रोकडे, आकाश वाघमारे, भाऊ रोकडे, लखन रोकडे, विशाल हातागळे, सुखदेव रोकडे, महिला आणि विद्यार्थी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानवी हक्क अभियानाचे गेवराई तालुकाध्यक्ष धोंडीबा हातागळे यांनी केले तर आभार डीपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष मदन हातागळे यांनी केले