समाजकार्य महाविद्यालयात बिरसा मुंडा जयंती साजरी

19

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
__________________________
पुसद(दि.15नोव्हेंबर):- येथील गुलाब नवी आझाद समाजकार्य महा. पुसद येथे बिरसा मुंडा यांच्या 164 व्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राध्यापक अशोक राठोड हे होते ,तर मुख्य अतिथी व मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डॉक्टर सुधीर गोटे हे होते. सदर कार्यक्रमांमध्ये बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाशन टाकण्यात आला.

पहिला क्रांतिकारी म्हणून त्यांची नोंद झाली ते बिरसा मुंडा यांच्या विषयी विस्तृत असे मनोगत डॉक्टर सुधीर गोटे यांनी व्यक्त केले तसेच भागवत ठाकरे, सुमित जोगदंडे ,प्राची इंगळे या विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडा यांच्या बाबत मत व्यक्त केले व त्यांच्या कार्याचा उजाळा देण्यात आला. प्रथम प्रतिमेला अभिवादन करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमाची सुरुवात जयश्री डोईफोडे हिच्या गीताने झाली. कार्यक्रमाचे संचालन वैष्णवी सोनवणे हिने पार पाडले तर आभार प्रदर्शन प्राची इंगळे, हिने पाडले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी हजर होते.