पत्नीनेच संपविली पतीची जीवन यात्रा- हार्ट अटॅक नसून तो खून होता- मोबाइलमुळे आले प्रकरण उघडकीस

16

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 15 नोव्हेंबर):-तक्रारदार कु. श्वेता शाम रामटेके, रा. गुरूदेव नगर, ब्रम्हपूरी यांचे वडील शाम पांडूरंग रामटेके, वय 66 वर्ष हे वनविभागातून निवृत्त असून ते घरी राहत होते. त्यांचे आंबेडकर चौक ब्रम्हपूरी येथे जनरल स्टोअर्सचे दुकान असून ते त्याची आई श्रीमती रंजना शाम रामटेके वय 50 वर्ष चालवित असत. त्यांचे दुकानाजवळ बांगड्या व भाजीपाला विक्रेते मुकेश राजबहादूर त्रिवेदी, वय 48 वर्षे, रा. पेठवार्ड, ब्रम्हपूरी यांचे दुकान होते. त्यांच्याशी जवळीक झाल्यावर त्यांचे साथीने शाम रामटेके यांना मारण्याचा कट रचण्यात आला. मुकेश त्रिवेदी यांनी रंजना रामटेके यांना झोपेच्या गोळया आणून दिल्या. दि. 06/08/ 2022 रोजी रात्री रंजना यांनी त्यांचे पतीस झोपण्यापूर्वी चहामध्ये 10 झोपेच्या गोळया दिले. ते गाढ झोपी जाताच त्यांचे असहायतेचा फायदा घेउन उशीने नाक तोंड दाबून ठार केले. घटनावेळी मृतकाच्या दोन्ही मूली नागपूरला असल्याने त्यांना व जवळच्या नातलगांना रंजना रामटेके यांचे मृत्यूची सूचना दिली. सर्व नातेवाईक आल्यावर त्यांना हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे भासवून त्यांचे अंत्यविधी केली.

घटना झाल्यावर रंजना रामटेके यांनी मुकेश त्रिवेदी कॉल करून सर्व हकीगत सांगितल्याने नकळत फोनवर त्यांचे संभाषण रीकॉर्ड झाले. दि.11.11.22 रोजी सदर फोन रीकार्डींग त्यांच्या मूलींच्या हाती लागल्यावर त्यांनी ते ऐकले असता त्यांना समजले कि त्यांचे वडीलांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला नसून त्यांना ठार करण्यात आले आहे. त्यावरून दि.12/11/22 रोजी पोलीस स्टेशन ब्रम्हपूरी येथे कु. श्वेता शाम रामटेके यांनी तक्रार दिली असता त्याबाबत दोन्ही आरोपींना पोस्टेला आणून कसून चौकशी करण्यात आली. त्यावरून सदर प्रकरण हे खून असल्याचे निष्पन्न झाले. दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही आरोपीविरूध्द कलम 302, 201, 120 ब भा.दं. वि. गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले असून ते जिल्हा कारागृह चंद्रपूर येथे दाखल आहेत. श्री मल्लिकार्जुन इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी मुल, अतिरीक्त कार्यभार ब्रम्हपूरी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा तपास पोलीस स्टेशन ब्रम्हपूरीचे ठाणेदार रोशन यादव व त्यांचे सहाय्यास सपोनी प्रशांत ठवरे पोहवा / अरून पीसे, नापो / नीतीन भगत व पोशी / अनूप कवठेकर करीत आहेत.