✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)
मो:-8698648634

गोंडपिपरी(10जुलै):- चामोर्शी तालुक्यातील वायगाव जवळ आज सकाळी झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक इसम गंभीर जखमी झाला आहे. मृत्यू झालेला व्यक्ती रविंद्रपुर येथील असून त्यांचे नाव श्री. संजित निरापद मिस्त्री, वय 38 असे असून जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव श्री. गौतम एकनाथ गोवर्धन वय 50 असे आहे. सकाळी 8.30 च्या सुमारास येनापुर येथून दोघे जण मोटार सायकल ने जाऊन येत असताना चालकाचा मनावरचा ताबा हरवला, अश्यात रस्त्याचा बाजूला असलेल्या झाडाला धडक दिली.

एकाच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्याने जागीच मृत्यू झाला तर दुसरा जखमी अवस्थेत आहे. जवळच्या परिसरातील लोकांना माहीत होताच त्यांनी जवळील पोलिस स्टेशन ला फोन करून सांगितले. येणापुर येथील ठाणेदार यांनी येऊन त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत.

Breaking News, चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ

©️ALL RIGHT RESERVED