गेवराई तालुक्यातील भोगलगाव, तलवाडा येथील शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या चोराच्या मुसक्या आवळल्या

37

🔸स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.!

✒️बीड, जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.16नोव्हेंबर):-ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या चोराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश. गेवराई तालुक्यातील भोगलगाव येथे एका कुटुंबावर हल्ला करून चोरी केल्याची घटना समोर आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ सूत्रे फिरवून आरोपीला जेरबंद केले आहे.

तालुक्यातील भोगलगाव येथे चिकणी शिवरातील एका शेतकरी कुटुंबावर हल्ला करून 13 शेळ्या, 1 मोबाईल, मंगळसूत्र चोरी केल्याची धक्कादायक ( 13 ) घटना समोर आली आहे. फिर्यादी सोजराबाई लक्ष्मण जाधव (वय 60 वर्षे, व्यवसाय घरकाम व शेती रा. भोगलगाव ता. गेवराई जि. बीड) यांनी सदर घटनेची तक्रार तलवाडा पोलीस ठाण्यात केली असून पोलिसांनी 24 तासांच्या आता आरोपीला जेरबंद केले आहे. फिर्यादी महिलेला आरोपींनी जबर मारहाण केल्याचे आढळून आले.

पोलिसांनी घटनेची तत्काळ दखल घेत, तपासाची सूत्रे फिरवून खबऱ्यांद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींना अटक केली आहे. आरोपी संतोष उर्फ संत्या ओमकार गायकवाड रा. तलवाडा हा रामनगर, तलवाडा याने केला आहे. आरोपीने त्याच्या साथिदारांच्या मदतीने ही चोरी केल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी सदर गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत केला आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आणखी या स्वरूपाचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून आणखी गुन्ह्यांची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

सदर आरोपीवर पोलिसांनी गु.र.नं. 220/2022 कलम 379, 34 भादवि3. पोलीस ठाणे तलवाडा गु.र.नं. 212/2022 कलम 379, 34 भादवि4. द्वारे गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून 04 शेळ्या व 01 करडू व नगदी 31000/- रु व पो.ठा.तलवाडा 220/2022 क.379,34 भादंवि मधील म्हशी विक्री केलेले 10000/- रु. नगदी असा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. या कार्यवाहीत महत्वाची कामगिरी नंदकुमार ठाकुर, पोलीस अधीक्षक बीड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, बीड येथील पो.नि. सतीश वाघ, पोउपनि संजय तुपे, कैलास ठोंबरे, सतीश कातखडे यांनी केलेली आहे.