राजाराम तोरणे विक्रमी मताधिक्याने विजयी होतील : महेश माने

31

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.16नोव्हेंबर):- प्राथमिक शिक्षक बँकेसाठी म्हसवड मतदार संघातून राजाराम तोरणे यांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असून प्राथमिक शिक्षक संघही एकसंघपणे राजाराम तोरणे यांच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळेच जिल्ह्यात विक्रमी मताधिक्याने ते विजयी होतील असा विश्वास माण तालुका शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष महेश माने यांनी व्यक्त केला आहे.

राजाराम तोरणे यांच्या प्रचार दौऱ्यानिमित्त विविध भेटी दिल्या त्यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मार्डी येथे ते बोलत होते. यावेळी माजी संचालक जगन्नाथ वीरकर, आर. डी. खाडे, जुनी पेन्शन संघटनेचे नेते सचिन विरकर, मार्डी शाळेचे मुख्याध्यापक विलास जाधव, मीनाक्षी सकुंडे, रेश्मा काळे, प्रेमा भोसले हे शिक्षक बांधवही उपस्थित होते.

यावेळी बोलताना संचालक आर. डी .खाडे म्हणाले, सत्ताधारी संचालक मंडळाने आपल्या कार्यकाळात सभासद हिताचेच निर्णय घेतले असून संपूर्ण कारभार पारदर्शकपणे केला आहे. कोरोना काळात कमी व्याजदरात सुरु केलेले कर्जप्रकार, कोरोना पीडित शिक्षक बांधवांना विविध योजनांतून केलेली मदत यामुळे मतदार सभासद विकास पॅनलच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. म्हणूनच राजाराम यांचे यांचा विजय निश्चित आहे.