राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे “घर तेथे ग्रामगीता वाचन अभियान” संपन्न

  37

  ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  चंद्रपूर (10 जुलै ):- गुरूपौर्णिमेच्या पावन पर्वात आॕनलाईन पध्दतीने राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती च्या वतीने घर तेथे ग्रामगीता वाचन अभियान राबविण्यात आले. परिषदेच्या व्हॕटसॲप समुहावर आवाहन केल्याप्रमाणे सहभागी मान्यवरांनी आपल्या परिवारासह घरीच सोशल डिस्टनसिंग पाळत परिवर्तनवादी तसेच स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज रचित ग्रामगीता ग्रंथाचे वाचन केले. ह्या अभियानात परसोडी येथील सुरेंद्र गणपती चोथले , राजुरा येथील सुभाष पावडे , ॲड. राजेंद्र जेनेकर , प्रभाकर बोबाटे, मूल येथील नामदेव पिज्दूरकर , गणेश मांडवकर ,श्री.वसंत ताजने, मानोली बुज चे येथील मनोहर नामदेव पासपूते ,मारोती सुदाम लोहे , तसेच मानोली बुज. ची गुरुदेव सेवा मंडळाची शाखा , चंद्रपूरचे आण्याजी ढवस ,उर्जानगर शाखेचे देवराव कोंडेकर ,विलास लटारी उगे ,सदानंद नवनाथ बोबडे,मुठरा , राजुरा येथील नामदेवराव पेचे, सौ. मंगला हरिश्चंद्र विरूटकर , मोहनदास मेश्राम , बाळा गोहोकार, लटारू मत्ते, प्रदीप वासाडे , मारोती डाखरे, मनोहर बोबडे , सुदर्शन विद्दे,सौ.पुजा खुशाल अडवे , भालर जि. यवतमाळ येथील प्रकाश ढोबे, माजरी वस्ती येथील संजीव पोडे , सचिन झाडे , कुणाल टोंगे , नयन डोंगे ,विलास गाडवे गोयेगाव , रामपूर चे भाऊराव बोबडे , अनिल चौधरी,विश्वास सूर परसोडी , गोंदिया चे महेंद्र दोनोडे,
  ,पंचाळा गुरुदेव सेवा मंडळ ,नागपूर येथील ज्ञानेश्वर लांडे , मोहनदास चोरे, जवाहरनगर राजुरा येथील गुरुदेव सेवा मंडळ , मानोलीचे पांडुरंग विरुटकर, बाळकृष्ण झाडे आदी ४१ सदस्यांनी सहभाग दर्शविला.
  गुरूपौर्णिमेच्या अभियानाचे प्रास्तविक परिषदेचे सरचिटणिस ॲड. राजेंद्र जेनेकर यांनी समाजमाध्यमातून प्रास्तविक केले .
  तर परिषदेचे प्रेरक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर ह्यांनी आपल्या मनोगतातून, राष्ट्रसंतानी सांगीतलेले
  गुरूपौर्णिमेचे महत्त्व , ग्रामगीता ग्रंथात विषद केलेल्या मानवी जीवनात स्वच्छतेचे , उद्योगशिलतेचे तत्व , संकटावर मात करणारे राष्ट्रसंताचे विचार यासंबंधी समाजमाध्यमातून सहभागी मान्यवरांशी संवाद साधला. अभियानात सहभागी झालेल्या सर्व राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या सदस्यांना आॕनलाईन सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र निर्मिती युवा कवी रामकृष्ण चानकापुरे यांनी करून दिले. यावर्षीच्या उद्भवलेल्या कोरोना संकट काळात आॕनलाईन पध्दतीने राबविण्यात आलेल्या गुरूपौर्णिमा उत्सव आपआपल्या घरीच परिवारातील सदस्यांनी साजरा केला. ग्रंथ वाचन कृतीचे सर्वांनी स्वागत केले.
  गुरूकृपेचा अधिकारी होण्यासाठी आपल्यात समन्वयवादी विचार अंगी असले पाहिजेत . राष्ट्रसंतानी तर ज्ञान आणि कर्म यांचा उद्घोष केलेला आहे. उत्तम कर्म केल्याशिवाय संतकृपा होत नसते. त्यांनी सांगीतलेली शिस्त पाळणे, जीवन उद्योगी बनविणे, त्यांना अपेक्षित ध्यान प्रार्थना नियमितपणे करणे यातून मानवी देहात नवचैतन्य निर्माण होत असते. आणि यातूनच व्यक्ती हा व्यापक बनत जातो.
  गुरू नव्हे हाडामासाचा । गुरू नव्हे जाती संप्रदाय । गुरु शुद्ध ज्ञानतत्वची आहे । अनुभवियांचे ।- ग्रामगीता ग्रंथात गुरूची व्याख्या शुध्द ज्ञान तत्वावर आधारीत केलेली दिसून येते आणि म्हणूनच ग्रामगीता ग्रंथाचे वाचन ,चिंतन आणि कृतीपर कार्यक्रमाचे योग्य नियोजन व्हावे , हे यावर्षीच्या अभियानाचे प्रमुख उद्दीष्ट होते. गुरूपौर्णिमा निमित्ताने राबविण्यात आलेल्या ह्या उपक्रमास श्रीगुरूदेव उपासक मंडळीचा सकारात्मक प्रतिसाद लाभला.