प्रशांत खंदारे ठरला ‘दमदार वक्ता दिग्रसचा’..!

54

🔸कलाम करंडक वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद!

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

यवतमाळ(दि.17 नोव्हेंबर):- येथील डॉ.एपीजे अब्दुल कलाम फोरमच्या वतीने आयोजित कलाम करंडक वक्तृत्व स्पर्धा 2022 ला दिग्रस शहर व परिसरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. ग्रामीण व शहरी शाळांच्या 134 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, थोर स्वतंत्रता सेनानी आणि देशाचे पहिले शिक्षण मंत्री, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती अर्थात राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या पर्वावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

येथील विद्यानिकेतन शाळेत आयोजित स्पर्धेचे उद्घाटन गट शिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू प्यारेलाल पवार, श्रीचंद राठोड, डॉ सैय्यद मुजाहिद, पोलिस उपनिरीक्षक विशाल बोरकर, सेवानिवृत्त प्राचार्या ज्योती निचत, माध्यमिक शिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष गजानन गोटे, विवेकानंद स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे प्रा. मुकेश देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडले.

‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील मुस्लिमांचे योगदान’ या विषयावर मुलांनी अभ्यासपूर्ण भाषणे केली. यावेळी मुलांच्या बोलण्याची तऱ्हा, हावभाव पाहण्यासारखे होते.

स्पर्धेचे प्रायोजक जनसंघर्ष अर्बन निधी बँकेचे अध्यक्ष प्रणित मोरे, नानोटे इन्शोरन्स सर्व्हिसेसचे संचालक अभय नानोटे, नवरंग मेडिकलचे संचालक अमीन नवरंगाबादे यांनी स्पर्धास्थळी भेट देवून आयोजनाबाबत आनंद व्यक्त केला.

इंग्रजी, हिंदी-उर्दू व मराठी अशा तीन भाषा गटात स्पर्धा पार पडली. प्रा.डॉ. रुपेश कऱ्हाडे, प्रा.डॉ. अपर्णा पाटील, प्रा. प्रितम गावंडे, प्राचार्य निवृत्ती ढोडरे, प्रसिद्ध शायर सलिम चौहान, ख्यातकिर्त हिंदी कवी कपिल बोरुंदीया, शिक्षिका अनिता नगराळे, केंद्रप्रमुख अनिल गादेकर, पुरुषोत्तम बोबडे, विवेकानंद खोडके, अनिस शेख यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

स्पर्धेच्या विजेत्यांना 14 हजारांची रोख पारितोषिके आणि प्रत्येक विजेत्याला 2 ग्रंथ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, स्कूल बॅग भेट देवून गौरविण्यात आले. बक्षीस वितरण दिग्रस विभागीय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार बंग, नगर परिषद मुख्याधिकारी सुधाकर राठोड, पोलिस उपनिरीक्षक देवानंद कायिंदे, सेवानिवृत्त कर्नल आर.एन. गोखले, केंद्रप्रमुख किरण बारशे, सचिन कोरडे यांच्या हस्ते पार पडले.

स्पर्धेच्या आयोजनात मिलिंद बाळासाहेब देशमुख (सिंगद), मुख्याध्यापक राजू ढोके, जनाई कोचिंग क्लासेसच्या संचालिका सौ. संगीता गजानन गोटे, गोदावरी अर्बन बँकेचे शाखा व्यवस्थापक राहुल कोल्हे-पाटील, शेतीमित्र संतोष चव्हाण (विठाळा), नंदकिशोर ढोले, अल्पसंख्याक कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सैय्यद शेरु, सैय्यद मोबिन, गफ्फार शेख यांचे सहकार्य मिळाले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कलाम फोरमच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

हे ठरले विजेते :- प्रथम क्रमांक प्रशांत गौतम खंदारे, द्वितीय म. मुसद्दीक म. सलिम, तृतीय कु. महेक बी तसलीम बेग, चतुर्थ मोहित लविश निमोदिया, विशेष पारितोषिक कु. समर परवीन जाहेद खान , प्रोत्साहन पर कु. अन्वी सुदर्शन कांबळे, संस्कृती बंडू कवठकर, वेदांत गजानन राठोड, इकरा माहिन म. नासिर.