चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शुक्रवार दिनांक १० जुलै रोजी एकाच दिवशी १२ कोरोना बाधित

30

🔺चंद्रपूर बाधितांची संख्या १६२ वर

🔺लग्नात सहभागी झालेले ५ जण पॉझिटीव्ह

🔺चंद्रपूर शहरात ५ बाधिताची नोंद

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि-10 जुलै):-जिल्ह्यामध्ये शुक्रवार दिनांक १० जुलै रोजी आरोग्य विभागाकडून आलेल्या माहितीनुसार एकाच दिवशी १२ बाधित पुढे आले आहेत. यामध्ये एका लग्न सोहळ्यात सहभागी झालेल्या पाच जणांचा सहभाग आहे. काल ९ जुलै पर्यंत जिल्ह्यामध्ये १५० पॉझिटीव्ह आढळले होते. आज दुपारपर्यंत त्यामध्ये १२ बाधिताची भर पडल्याने एकूण संख्या १६२ झाली आहे. आतापर्यंत ८० नागरिक कोरोना मुक्त झाले असून सध्या ८२ नागरिक जिल्हयात उपचार घेत आहेत. १६२ संख्येमध्ये चंद्रपूर शहरात निदान झालेले अन्य जिल्हयातील ४ बाधित आहेत. हे चारही बाधित राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आहेत.
आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील २१ वर्षीय युवकाचा समावेश आहे. हा युवक सिकंदराबाद येथून १ जुलैला आल्यापासून संस्थात्मक अलगीकरणात होता.
इंदिरानगर चंद्रपूर येथील २१ वर्षीय महिला हैद्राबाद येथून १ जुलै रोजी परत आली होती.आल्यापासून संस्थात्मक अलगीकरणात होती.
दाद महाल वार्डातील आणखी एक २१ वर्षीय महिला पॉझिटीव्ह ठरली आहे. ही महिला जळगाव येथून आल्यानंतर २९ जून पासून संस्थात्मक अलगीकरणात होती.
आणखी एक रुग्ण भानापेथ वॉर्ड मधून पुढे आला असून या 29 वर्षीय युवक हैदराबादवरून परत आला होता. आता खाजगी हॉटेलमध्ये संस्थात्मक अलगीकरणात होता.
याशिवाय बिहार राज्यातील पाटणा शहरातून परत आलेल्या ४५ वर्षीय नागरिकाचा समावेश आहे. परत आल्यापासून खा नागरिक संस्थात्मक अलगीकरणात होते. वरिल पाहिल्या ३ बाधितांची स्वॅब तपासणी ७ जुलैला झाली होती. तर चवथ्या व पाचव्या बाधिताची स्वॅब तपासणी ८ जुलैला करण्यात आली.
वरोरा येथील पाच बाधित पुढे आले आहेत. यामध्ये सोमठाणा पोस्ट टेंभुर्णा येथील 38 वर्षीय महिला, ५० वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय महिला, ३० वर्षीय पुरुष हे एकाच कुटुंबातील चार जण आहेत. जालना येथे एका विवाह सोहळ्यात हे सर्व सहभागी झाले होते. याच लग्न सोहळ्यात सहभागी झालेल्या २९ वर्षीय भद्रावती शहरातील चारगाव कॉलनीतील पुरुषही पॉझिटीव्ह ठरला आहे.
तर वरोरा शहरातील आजचा ५ वा बाधित २७ वर्षीय युवक असून मध्य प्रदेश मधून परत आला होता. तेव्हापासून गृह अलगीकरणात होता. वरोरा येथील या सर्वाचा स्वॅब ७ जुलै रोजी घेण्यात आला होता.
बल्लारपूर शहरातील ७ वर्षीय मुलगा पॉझिटीव्ह पुढे आला आहे. या मुलांसह कुटुंबातील ५ सदस्य कारने मुंबईवरून परत आले होते. अन्य चार जण निगेटिव्ह ठरले आहे. मात्र मुलगा पॉझिटिव्ह ठरला आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ मे ( एक बाधित ) २जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) ६जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १०जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) १७जून ( एक बाधित ) १८ जून ( एक बाधित ) २१जून ( एक बाधित ) २२ जून ( एक बाधित ) २३ जून ( एकूण ४ बाधित ) २४ जून ( एक बाधित ) २५ जून ( एकूण १० बाधित ) २६ जून ( एकूण २ बाधित ) २७ जून ( एकूण ७ बाधित ) २८ जून ( एकूण ६ बाधित ) २९ जून ( एकूण ८ बाधित ) ३० जून ( एक बाधित ) १ जुलै ( २ बाधित ) २ जुलै ( २ बाधित ) ३ जुलै ( ११ बाधित ) ४ जुलै ( एकूण ५ ) ५ जुलै ( एकूण ३ ) ६ जुलै ( एकूण ७ ) ८ जुलै ( एकूण ५ ) ९ जुलै ( एकूण १४ ) व १० जुलै ( एकूण १२ )अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित १६२ झाले आहेत. आतापर्यत ८० बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे १६२ पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता ८२ झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.