काका पुतण्याच्या आमरण उपोषणाला यश-उपोषण घेतले मागे

28

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.17नोव्हेंबर):- येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा समोर काका-पुतणे जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड व विशाल राठोड दोन्हीही दिनांक १६-११-२०२२ पासून काही मागण्या घेऊन उपोषणाला बसले होते , प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती येथे पूर्ण वेळ दोन डॉक्टर द्या अशी मागणी होती व जिवती येथील ग्रामीण रुग्णालय तात्काळ चालू करा व प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती अंतर्गत सर्व बारा उपकेंद्रातील आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेवक महिला व समुदाय आरोग्य अधिकारी यांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी अशी मागणी होती.

मा.जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ त्यांच्या माध्यमातून दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची मागणी पूर्ण केली व बाकीच्या दोन मागण्या डिसेंबर च्या शेवटपर्यंत पूर्ण करू असे अस्वासन दिले. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी ०४:०० वाजता आंदोलनाला स्थगिती घेण्यात आली. उपोषण कर्ते सुदामभाऊ राठोड व विशाल राठोड अखेर दोन्ही काका-पुतन्यच्या आंदोलनाला यश आले .