

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)
घुग्घूस(दि.17नोव्हेंबर):-लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेड या उद्योगाकडून सामाजिक दायित्व निधी अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात असून, जिवनावश्यक वस्तुंची भेट दिली जात आहे. दरम्यान, बालकदिनी घुग्घूसच्या प्रियदर्शिनी कन्या विद्यालयात संगणक संच तर जनता विद्यालयात वॉटर कुलर भेट स्वरूपात देण्यात आले.लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेडकडून यापूर्वी सीएसआर निधीतून विविध कामे करण्यात आली असून, परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना संगणकाचे अद्ययावत ज्ञान मिळावे व शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने या भेट वस्तू देण्यात आल्या.
यावेळी युनिट हेड संजय कुमार, उपाध्यक्ष प्रशांत पुरी, सहाय्यक उपाध्यक्ष पवन मेश्राम, व्यवस्थापक तरूण केशवाणी व रतन मेडा उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना युनिट हेड संजय कुमार यांनी मुलांना अभ्यासासोबत जिवनकौशल्य शिकण्याचा सल्ला दिला. अनेक छोट्या-मोठ्या कामांमध्ये कौशल्याचा वापर होत असून, जी गोष्ट योग्य नाही, तिला ठामपणे नाही म्हणणे, हे सुद्धा जिवनकौशल्य असल्याचे सांगितले. त्यामुळे अभ्यासासोबतच जिवनकौशल्य शिकण्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देण्याचाही सल्ला दिला. याप्रसंगी मुख्याध्यापिका अन्नु खानझोडे, मुख्याध्यापक विठोबा पोले दोन्ही शाळांमधील शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.