

🔸वैद्यकीय अधिकाऱ्याचा कर्मचाऱ्यांना व रुग्णांना नाहक त्रास
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
अर्जुनी-मोरगाव(दि. 18 नोव्हेंबर):- डॉ. सुरेंद्र खोब्रागडे हे मागील 5 वर्षापासुन प्राथमिक आरोग्य केंद्र गोठनगाव येथे कार्यरत आहेत. गोठनगाव प्रा. आ. केंद्राअंतर्गत येत असलेले सर्व गावे आदिवासी असून तेथील जनता ही गरीब आहे. हे उच्च आरोग्य केंद्राकडे धाव घेवू शकत नाही. येथिल जनता उपचारासाठी प्रा. आ. केंद्र गोठनगाव येथेच येत असतात. परंतु येथे आल्या नंतर वैद्यकिय अधिकारी डॉ. सुरेंद्र खोब्रागडे यांच्या कडुन योग्य ती उपचार होत नाही आणि रूग्णांना योग्य वागणूक देत नाही. मानव विकास अंतर्गत येणारे कामे बरोबर होत नाही,गरोदर मातांना योग्य ती तपासणी करीत नाही.
वैद्यकिय अधिकारी डॉ. सुरेंद्र खोब्रागडे हे जेव्हा पासुन येथे कार्यरत झाले तेव्हापासुन मुख्यालयी राहत नाही. कधी येतात आणि कधी जातात हे सुध्दा माहिती होत नाही. कर्मचार-यांना विचारले असता आताच निघुन गेले कुठे गेले आम्हाला माहित नाही असे उडवाउडवीचे उत्तर देतात. आम्हाला माहिती मिळाली की ते खाजगी दवाखाना सुरू करून ते आपला व्यवसाय करीत आहेत.
आपण योग्य ती चौकशी करून वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेंद्र खोब्रागडे यांची बदली करण्यात यावी. येणा-या 30/11/2022 पर्यंत त्यांची बदली न झाल्यास दि.01/12/2022 ला शिवसेना तालुका प्रमुख चेतनजी दहिकर आणि विभाग प्रमुख नरेशजी बोरकर हे प्रा.ओ.केंद्र गोठनगाव येथील मुख्य प्रेवशद्वारा समोर उपोषन करण्यात येईल. असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून देण्यात आला. यावेळी ममता ताई पवार शिवसेना महिला उपजिल्हा संघटिका , शिल्पा ताई घनाडे तालुका महिला संघटिका, नरेश बोरकर विभाग प्रमुख गोठनगाव प्रतिभा ताई वावरे तालुका शहर संघटिका, राजेश कापगते उपशहर प्रमुख अर्जुनी /मोर उपस्थित होते.