शेतातील विजेचे खांब व रोहित्रांचे भाडे द्या – पियूष रेवतकर

15

🔸जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले निवेदन

✒️वर्धा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वर्धा(दि.19नोव्हेंबर):- शेतामध्ये महावितरण व खासगी कंपनीचे विजेचे खांब, तार, रोहित्र असल्यास त्याचे शेतकऱ्यांना भाडे द्यावे अशी मागणी जनकल्याण फाऊंडेशनचे प्रदेशाध्यक्ष तथा युवा सामाजिक कार्यकर्ते पियूष रेवतकर यांनी केली आहे.जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात पियूष रेवतकर यांनी म्हटले,की वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतात महावितरण व खासगी कंपन्यांनी विजेच्या तारा,पोल,रोहित्र उभारले असून आर्थिगसाठीही जमिनीचा वापर केला आहे.

यासाठी सबंधित शेतकऱ्यांना कोणतेही भाडे दिलेले नाही. हे भाडे देणे कंपनीला बंधनकारक आहे.मात्र कोणत्याही शेतकऱ्यांची परवानगी न घेता त्याला भाडे न देता ही सर्व कामे करण्यात आली आहेत.त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर करण्यात आला आहे.त्यात भर म्हणून शेतातून गेलेल्या विजेच्या तारांना झोळ पडल्याने त्यातून ठीनग्या पडल्याने शेतीतील पिकांना आग लागून अनेक शेतकऱ्यांचे नुकसानही झाले आहे.

अगोदरच शेतकऱ्याला अतिवृष्टी,दुष्काळ,कोरोणा काळ याचा फटका बसला असून अनेक शेतकरी आत्महत्येचा पर्याय निवडत आहेत.अशा शेतकऱ्यांना आपल्या कार्यालयाकडून भाडे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. महावितरण कार्यालयाने भारतीय टेलिग्राफ कायदा १८८५ च्या कलम १६ नुसार कोणतीही कायदेशीर परवानगी आपल्या कार्यालयाकडून घेतलेली नाही.त्यामुळे या कायद्यानुसार महावितरण कंपनीकडून वरील यापरासाठी घेतलेल्या जमिनीचे भाडे,नुकसानभरपाईची परिगणना करून त्यावरील नियमाप्रमाणे व्याज आकारून संपुर्ण रक्कम सबंधित शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावी,अशी मागणी पियूष रेवतकर यांनी केली आहे.