पक्ष बळकटीसाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी जनतेची सेवा करावी- आ.धर्मराव बाबा आत्राम

16

🔹कोरोना नियंत्रणासाठीही मदत करावे
🔸आ.धर्मराव बाबा आत्राम यांचे आवाहन

✒️अहेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अहेरी(10 जुलै)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष बळकटीसाठी व सुरु असलेल्या कोरोना नियंत्रणासाठी जनतेचे सेवा करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
ते शुक्रवार 10 जुलै रोजी अहेरीच्या राजवाड्यात पक्षाच्या प्रमुख पदाधिकारीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
यावेळी प्रामुख्याने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताईं आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर, रा. काँ.चे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, सामाजिक कार्यकर्ते बबलू भैय्या हकीम, सभापती युधिष्ठिर बिश्वास, ज्येष्ठ नेते यशवंत दोंतुलवार आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्ष स्थानावरून बोलतांना आमदार धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा असून प्रत्येक कार्यकर्त्यांनी पक्ष मजबूत व बळकटीसाठी सक्रियतीने कार्य करावे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य व ध्येय धोरणे घराघरात पोहचवावे असे म्हणत पक्षाविषयी व कोरोना नियंत्रणा विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविन्द्र वासेकर, बबलू भैय्या हकीम यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा विषयी व कोरोना नियंत्रणासाठी आपले विचार व्यक्त केले.
बैठकीत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला जिल्हा कार्याध्यक्ष शाहीन भाभी हकीम, उपसरपंच पुष्पाताई अलोने,ज्येष्ठ नेते मुतन्ना दोंतुलवार, श्रीकांत मद्दीवार, एटापल्ली येथील तालुकाध्यक्ष दौलत दहागांवकर, भामरागडचे श्रीकांत मोडक, सिरोंचा येथील मधुकर कल्लूरी, मुलचेरा येथील हरिपद पांडे, लक्ष्मण येरावार, रा.काँचे सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष महेश अलोने, नगर सेवक शैलेश पटवर्धन, अमोल मुक्कावार, श्रीनिवास विरगोनवार, मखमूर शेख, एम.डी. शानू आदी व पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.