सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा अधिवेशन दि. ११ डिसेंबर, २०२२ रोजी कुऱ्हे पानाचे ( भुसावळ ) येथे होणार !…

31

🔹स्वागताध्यक्षपदी – मुकुंदभाऊ सपकाळे तर कार्याध्यक्षपदी – सुधाकरभाऊ बडगुजर यांची एकमताने निवड

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.20नोव्हेंबर):-नुकतीच सत्यशोधक समाज संघाच्या जिल्हा संयोजन समितीची बैठक संपन्न झाली. दि ११ डिसेंबर, २०२२ रोजी कुऱ्हे पानाचे ( भुसावळ, जि. जळगांव ) येथे सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा अधिवेशन घेण्याचे ठरले.अधिवेशनच्या स्वागताध्यक्ष म्हणून मुकुंदभाऊ सपकाळे यांची एकमताने निवड करण्यात आली तर कार्याध्यक्ष म्हणून सुधाकरभाऊ बडगुजर यांची निवड करण्यात आली. या अधिवेशनात जळगांव जिल्ह्याचा सत्यशोधक चळवळीचा इतिहास, शेती, शिक्षण व शिक्षण क्रांतीचे आद्य जनक – सत्यशोधक महात्मा फुले यांना अपेक्षित कृषी संस्कृती याविषयांवर चर्चा होणार आहे.

या अधिवेशनाचे उदघाटन सत्यशोधक सिताराम व धनाजी नाना चौधरी यांचे नातू मा.आमदार शिरीषभाऊ चौधरी हे करणार आहेत. सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक, संशोधक प्रा.जी.ए. उगले ( पैठण ), फुले-आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार प्रा.प्रल्हाद लुलेकर ( औरंगाबाद ) व भारतीय कृषी संस्कृतीचे भाष्यकार डॉ. राजेंद्र कुंभार ( कोल्हापूर )आदी. मान्यवर चर्चेत सहभागी होणार आहेत.

’भारत जोड़ो’ यात्रा : जाना किधर है? मंजिल कहाँ है??

संपूर्ण जळगांव जिल्ह्यातून अधिवेशनास कार्यकर्ते उपस्थिती लावणार आहेत. बैठकीला प्रमोद उंबरकर , विजय लुल्हे, नाना पवार, विश्वासराव पाटील, सतिश तात्या, कविराज पाटील, शिवदास महाजन, रमेश वऱ्हाडे, राजू जाधव, आबासाहेब राजेंद्र वाघ, एच.डी.माळी सर, लक्ष्मण पाटील, कैलास जाधव, भगवान रोकडे, हारून मन्सूरी, सुरेश झाल्टे व अरविंद खैरनार, प्रमोद पाटील आदी. कार्यकर्ते उपस्थित होते.