आत्महत्याग्रस्त पीडित कुटुंबियांची सुदामभाऊ राठोड यांनी घेतली भेट

56

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.21नोव्हेंबर):-अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील राहपली खुर्द येथील शेतकरी बाबुराव गणपती मुंडे (वय ४३ वर्ष) यांनी सततच्या नापिकीमुळे कर्जबाजारी झाल्याने व SBI पाटण बँकेचे 1 लाख 25 हजार रुपये कर्ज असल्याने, शेतात तर केलेला खर्च निघत नाही म्हणून कर्जापायी 15 तारखेला सकाळी 10 वाजता विषप्राशन करून आत्महत्या केली.

न्यूज पोर्टलला शासनमान्यता!

मग या शेतकऱ्याचा वाली कोण? नाही शासन व नाही प्रशासन.जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली व प्रशासनाला विंनती केली व आत्महत्या ग्रस्त पीडित कुटुंबियाला तात्काळ 5 लाखाची आर्थिक मदत शासनातर्फे देण्यात यावी अशी मागणी केली.

जिगरबाज…!

कारण पीडित कुटुंबियांचा आप्तपरिवार 1 मुलगा 3 मुली व पत्नी घरचा कर्ता गेल्याने हा परिवार आपला उदरनिर्वाह कसा करेल हा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी शासनाने तात्काळ SBI पाटण बँकेचे 1 लाख 25 हजार रुपये माफ करावे व शासनातर्फे 5 लाखाची आर्थिक मदत देण्यात यावी असे सुदामभाऊ राठोड यांनी प्रशासनाला विनंती केली.

’भारत जोड़ो’ यात्रा : जाना किधर है? मंजिल कहाँ है??