ने.हि.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ब्रम्हपुरीच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेसाठी निवड

13

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.22 नोव्हेंबर):-विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना सदैव प्रोत्साहन देत असंख्य विद्यार्थी घडवणाऱ्या पंचक्रोशीतील नामांकित ने.हि. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ब्रम्हपुरी येथील कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी चेतन सुधाकर धंदरे व यश गणेश नागपुरे यांनी जिल्हास्तरीय कला उत्सव स्पर्धेत अनुक्रमे नाट्य भूमिका अभिनय व खेळणी बनवणे या कला प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केले असून त्यांची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेसाठी निवड झाली आहे. केंद्र शासन सन 2015-16 पासून केंद्रीय कला उत्सवाचे आयोजन करित आहे.

या नवोपक्रमामुळे राज्यातील गुणवंत विदयार्थ्यांना आपली सर्वोत्तम कला राष्ट्रीय पातळीवर सादर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ने.हि. कनिष्ठ महाविद्यालयाचे चेतन सुधाकर धंदरे व यश गणेश नागपुरे या शेतकरी कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेत आपली सर्वोत्तम कला सादर करतांना राज्य स्तरावर विद्यालय व तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.

यशस्वीतांना प्रा.पी.आर. जिभकाटे ,प्रा.डॉ. पी.एन.बेंदेवार , प्रा.कु.एन.डब्लू.खाडीलकर आणि आशिष बोधे सर यांचे मार्गदर्शन मिळाले.राज्यस्तरीय कला महोत्सव स्पर्धेत निवड झाल्याबद्दल चेतन व यश यांचे संस्थेचे सचिव अशोकजी भैया साहेब तथा संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य जी.एन.रणदिवे सर, उपप्राचार्य के.एम.नाईक सर, पर्यवेक्षक पी.व्ही.घोरुडे सर तथा सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद व विदयार्थी प्रतिनिधी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.