धारखेड येथे विविध विकास कामांचा भूमीपूजन सोहळा

26

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.22नोव्हेंबर):-लोक मतदानाचा अधिकार वापरून त्यांचा लोकप्रतिनिधी ठरवित असतात. म्हणून लोकशाहीत लोकांच्या मताला फार किंमत आहे. त्यामुळे राजकारणात निवडून येण्यासाठी तुमच्या पाठीशी सर्वसामान्य जनता असणे जसे आवश्यक आहे. अगदी तसेच राजकारणात यशस्वी होण्यासाठी लोकसंपर्क चांगला असणे गरजेचे असते, असे प्रतिपादन गंगाखेड विधानसभेचे कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले.

तालुक्यातील धारखेड येथे विविध विकास कामांचा भूमीपूजन सोहळा आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतराव चोरघडे, माजी सभापती बाळासाहेब निरस, सोनपेठचे सभापती श्रीकांतराव मोरे, विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी सोळंके, तालुकाध्यक्ष रामप्रसाद सातपुते, राजेभाऊ बापू सातपुते, नामदेवराव निरस, प्रा.मुंजाजी चोरघडे, उध्दवराव चोरघडे, शासकीय गुत्तेदार महंम्मद खमरोद्दीन, अक्षय चकोटे, गोपीनाथ भोसले, उध्दवराव खुपसे, ज्ञानेश्वर भुमरे, बालाजी लिंगायत होते.

संविधान Indian condition मानणारे जागृत आहेत काय ?

कोणत्याही पक्षाचे किंवा व्यक्तीचे राजकारण हे लोकांच्या मतावरच चालते. त्यामुळे आपल्याकडे लोकशाही व्यवस्था फारच मजबूत आहे. लोकांना त्यांचे लोकप्रतिनिधी ठरविण्याचा हक्क व अधिकार संविधानाने दिला आहे. त्यानुसार गावखेड्यातल्या सरपंच पदापासून ते देशाच्या संसदेपर्यतचे लोकप्रतिनिधी मतदान करून ठरविले जातात. त्यामुळे संपूर्ण जगात लोकशाही प्रधान देश म्हणून भारताची ओळख आहे, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी बोलताना म्हटले आहे.

सावरकर का नाम बदल दो, विनायक से वीर कर दो!

याप्रसंगी जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन, गौण खनिज निधीतून बहुपयोगी व्यासपीठ व मुलींचे स्वच्छतागृह, १५ व्या वित्त आयोगातंर्गत वॉटर फिल्टरचे लोकार्पण अशा तब्बल २० कोटी रुपये निधी प्राप्त झालेल्या विविध कामांचे भूमीपूजन करण्यात आले.

लोकपयोगी हि विकासकामे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या Stay प्रयत्नातून पूर्णत्वास आली आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत मस्के तर सूंत्रसंचालन प्रा.मुंजाजी चोरघडे आणि आभार उध्दवराव चोरघडे यांनी मानले. यावेळी शाळेतील शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वयंघोषित साईबाबांचे अवतार!