जागतिक पुरुष दिन चर्चासत्राने संपन्न

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.22नोव्हेंबर):-भारतीय परिवार बचाव संघटनेतर्फे दिनांक 19 नोव्हेंबर ला जागतिक पुरुष हक्क दिन असून ह्या दिवशी पत्नीपीडित पुरुषांचे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते त्यात अनेक पत्नी पिडीतानी सहभाग नोंदविला प्रत्येकाने आपापल्या व्यथा मांडल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ नंदकिशोर मैंदलकर, प्रदीप गोविंदवार, सुभाष नरुले, सचिन बरबटकर, स्वप्निल सुत्रपावर, गौरव अक्केवार, विनोद करमरकर, प्रमोद आक्केवर, मारोती जुमडे, कुणाल खनके, गंगाधर गुरूनुले, पिंटू मुन, स्वप्नील गावंडे, राजू कांबळे, महेश मसराम, आदी उपस्थित होते.

चर्चासत्रात पत्नीपीडितांना आपल्या व्यथा मांडल्या पुरुष व महिलांकरता समान कायदा व्हायला हवा आज महिलांच्या बाजूने अनेक कायदे आहेत परंतु पुरुषांच्या संरक्षणाकरता एकही कायदा नाही महिलांना त्यांच्या संरक्षणाकरिता केलेल्या कायद्याचा दुरुपयोग करून पुरुष व सासरच्या मंडळींना हा त्रास देत देतात त्यांच्यावर खोटे नाते आरोप लावून गजाआड करण्याची खुमखुमी दाखवतात त्याला न्यायाचे राज्य म्हणायचे काय? N C R B च्या सर्वेक्षणानुसार पत्नीच्या खोट्या आरोपामुळे दरवर्षी 92 हजार ते एक लाख पत्नीपीडित आत्महत्या करीत आहेत सांगा विवाह संस्था अबाधित राहील काय? पुरुषांचा विवाह या पवित्र संस्कारावरून विश्वास उडाला आहे लग्न झाले की लगेच हुंडाबळीची केस करून घटस्फोटाकरिता अवास्तव पैशाची मागणी करणे ही खंडणी नवे काय?

संविधान Indian condition मानणारे जागृत आहेत काय ?

हुंडाबळी व गृहींसाचार, पोटगी, विवाहोत्तर बलात्कार या कायद्यामुळे पुरुष वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे हुंडाबळी कायदा 1980 च्या दशकातील कायदा आहे त्यात सुधारणा व्हायला नको काय ? हुंडाबळीच्या 98% केसेस ह्या खोटे आहेत हे शासनाच्याही लक्षात आलेले आहे परंतु कायदा आड येतो.हुंडाबळी केस ही खोटी आढळल्यास पत्निवरही कार्यवाही व्हायला हवी. देशात पुरुषप्रधान संस्कृती आहे.परंतु पुरूषकरिता पुरुष आयोग नाही शोकांतिका आहे. महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुषांनाही पुरुष आयोग असायला हवा. कार्यक्रम कार्यक्रमाचे संचालन मोहन जीवतोड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रदीप गोविंदवार यांनी केले.

सावरकर का नाम बदल दो, विनायक से वीर कर दो!

चंद्रपूर, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED