धरणगाव तालुकास्तरीय खो -खो स्पर्धां चावलखेडा येथे संपन्न!..

28

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दिन.22नोव्हेंबर):-वार सोमवार रोजी तालुकास्तरीय
शालेय खो खो क्रीडा स्पर्धां नि.हा.चावलखेडा हायस्कूल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या होत्या तरी या स्पर्धांचे उद्घाटक म्हणून नि. हा. हायस्कूलचे मुख्याध्यापक जी.बी.पाटील व तालुका क्रीडा समन्वयक सचिन सूर्यवंशी यांनी केले.

या शालेय क्रीडा खो – खो स्पर्धांमध्ये 14 वर्ष , 17 वर्षे, 19 वर्ष वयोगट मिळून एकूण 30 संघांनी तालुक्यातून सहभाग नोंदवला. या क्रीडा स्पर्धा पार पाडण्यासाठी पंच म्हणून चावलखेडा हायस्कूलचे क्रीडाशिक्षक व्हि.यु.पाटील, के.एस.पाटील सर, व्ही.बी.पाटील, जी.आर. पाटील, व अनोरे हास्कूलचे क्रीडा शिक्षक आर.बी.महाले, व ए.ए.पाटील. महानुभाव सर, डी.बी. मनोरे तसेच पी.आर. हायस्कूलचे क्रीडाशिक्षक एम.डी.परदेशी विशाल राजपूत तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांनी या स्पर्धा पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

14 व 17 वर्ष मुलींच्या वयोगटात बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालय धरणगाव संघ विजयी झाले तर मुलांच्या गटात नि.ह.चावलखेडा विद्यालय विजयी ठरले 19 वर्ष वयोगटात ए.सी.एस. कॉलेज धरणगाव संघांनी विजय मिळवला तसेच उपविजेता सतरा वयोगटात मुले झुरखेडा हायस्कूल व मुली बी जे महाजन विद्यालय अनोरे तर 14 वर्ष वयोगटात चांदसर आश्रम शाळा राहिले.उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के एस पाटील सर व आभार व्ही. यु. पाटील सर यांनी मानले. खो-खो या संघाच्या क्रीडा स्पर्धा खेडीमेडीच्या वातावरणात पार पडले आहेत.