धरणगाव येथे यु-डायस कार्यशाळा उत्साहात संपन्न !…..

34

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.22नोव्हेंबर):- इंदिरा गांधी कन्या विद्यालय धरणगाव येथे यु-डायस प्लस कार्यशाळा कार्य कुशल गट शिक्षण अधिकारी रवी किरण बिऱ्हाडे, व डायटचे प्राचार्य डॉक्टर विद्या बोरसे, इंदिरा कन्या विद्यालयाचे सचिव सी.के.पाटील, यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

तालुकास्तरीय कार्यशाळेत यु-डायस प्लस फॉर्म कसा भरावा याबाबत सखोल मार्गदर्शन कार्य कुशल गटशिक्षण अधिकारी रविकिरण बिऱ्हाडे, डायटचे अधिव्याख्याता डॉक्टर विद्या बोरसे, यांनी केले तसेच व्ही.स्कूल ॲप डाऊनलोड करून विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग कसा करावा.

निपुन भारत अंतर्गत माता पालक गट तयार करणे. बालकांचे होणारे हंगामी स्थलांतराचे सर्वेक्षण, बालरक्षण ॲप, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेशन, फिट इंडिया मोहीम, राजर्षी शाहू महाराज तालुकास्तरीय निबंध स्पर्धा, तंबाखू मुक्त शाळा, सेवा पुस्तक अपडेट करणे, शालेय पोषण आहार ऑडिट, आयटीएस कायद्याची माहिती, निपुन चाचणी, बाला उपक्रम, शिष्यवृत्ती परीक्षा, अप्रगत विद्यार्थ्यांचे अध्यापन, इत्यादी बाबींवर त्यांनी सखोल असे मार्गदर्शन केले कार्यशाळेत सी के पाटील, केंद्रप्रमुख, गट साधन केंद्रातील सर्व साधन व्यक्ती , तज्ञ मार्गदर्शक, तालुक्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते.