माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तलवाडा ची विद्यार्थिनी लाड प्रतिक्षा विक्रम जलतरण मध्ये जिल्हास्तरावर प्रथम विभागासाठी निवड

28

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

नुकत्याच संपन्न झालेल्या तालुका व जिल्हा स्तरावरील शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या विविध क्रीडा स्पर्धेमध्ये माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय तलवाडा शाळेने घवघवीत यश संपादन केले असून यामध्ये कु. प्रतिक्षा विक्रम लाड ही जलतरण मध्ये जिल्हास्तरावर प्रथम आली असून तिची विभागस्तरावर निवड झाली आहे.

तालुकास्तरावर 100 मीटर धावणे मध्ये निकम अभिजीत दत्तात्रय,800 मीटर धावणे मध्ये नाटकर वैभव अनंता हे द्वितीय आले असून यांची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे. तर उंच उडीमध्ये मिंड सुनील रंगनाथ,तर लांब उडीमध्ये ढेरे पवण नामदेव हे दोन्हीही विद्यार्थी तालुकास्तरावर प्रथम आले यांची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशासकीय अधिकारी तथा शाळेचे प्राचार्य श्री.प्रमोद गोरकर त्याचबरोबर मार्गदर्शक डावकर सर, गोगुले सर, हाटोटे सर, पर्यवेक्षक हाटकर सर, प्राध्यापक भोसले सर, काकडे सर, गिरे सर, पाठक सर, पैठणे सर, वाघमारे सर, पाटील सर,उबाळे सर, तौर सर, क्रीडा शिक्षक पवार डि.के. ढाकणे सर, विशाल काबळे सर,सगळे सर, आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.