चिमूर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या अतिक्रमण धारकांना हक्काचे पट्टे देऊन तात्काळ घरकुल मंजूर करून नियमित करण्यात यावे

🔹काँग्रेस मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांची मागणी

✒️सुयोग डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.24नोव्हेंबर):-चिमूर नगर परिषद अंतर्गत येत असलेले गोर गरीब गरजू लोक वर्षानो वर्ष आपले अतिक्रम करून आपला गुजारा करीत आहे. परंतु शासन यांचेकडे का लक्ष देत नाही असा सवाल काँग्रेसचे मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांनी केले आहे. काही शासकीय योजना येत असते आणि आता पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल मंजूर होऊन आले आहे. परंतु या अतिक्रम जागेवर हक्काचा शासनाचा कोणताही पट्टा नसल्यामुळे त्या घरकुल योजनेपासुन वंचित आहेत नगर परिषदेने काही ठिकाणी, इंदिरा नगर येथील काही लोकांचे पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल मंजूर होऊन आले आहे.

सावरकर का नाम बदल दो, विनायक से वीर कर दो!

आणि त्यांना नगर परिषद कडून पत्र देण्यात आले की आपले घरकुल मंजूर झाले आहे. आपण नगर परिषद ला काही कागपत्रे जमा करावे आणि बांधकाम मंजुरी घेऊन कामाला सुरूवात करावे परंतु अतिक्रम असलेल्या जागेचा शासणा कडून पट्टा आवश्यक आहे. आता इंदिरा नगर येथील लोकांकडे असा कोणताही पट्टा नाही आहे . काही वर्षांपूर्वी शासनाने काही लोकांना एक आदेश म्हणून शासनाने पत्र दिलेले आहेत तो आदेश पत्रावर नगर परिषद घरकुल का देत नाही असा सवाल काँग्रेसचे पप्पुभाई यांनी केले आहे. आणि आता पट्टा नसल्यामुळे येथील जनतेला घरकुल योजना पासुन वंचित राहण्याची वेळ येतांनी दिसत आहे.

आणि यात शासनाचा सुध्दा महसूल ( कर ) बुडत आहे. करिता याकडे नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या सर्व अतिक्रमण धारकांची चौकाशी करून अतिक्रमण धारकांना कायमचे पट्टे देऊन कर लावून कर आकारणी करण्यात यावे व घरकुल योजनेत घरकुल मंजूर करण्यात यावे जेणे करून नगर परिषदिले मालमत्ता कर जमा होईल आणि जनतेचे प्रश्न सुध्दा सुटेल असेही नगर परिषदचे पाणी ,लाईट वापरतात आणि त्यांचा घरा पर्यंत कचरा गाडी जाते त्यांचा कचरा नगर परिषदची गाडी नेते मग त्यांचा कडून कर का नाही घेऊ शकत करीता शासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी काँग्रेसचे मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांनी केले आहे.

अब तेरा क्या होगा रे बुलडोजर!

चंद्रपूर, महाराष्ट्र, मागणी, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED