इंग्रजी टॅलेंट हंट तालुकास्तरीय स्पर्धा संपन्न Parbhani-Jintur-Ed- Talent Hunt

36

✒️परभणी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

परभणी(दि.24नोव्हेंबर):- नोव्हेंबर महिन्यात परभणी जिल्हा गुणवत्ता कक्ष यांच्या संकल्पनेतून इंग्रजी भाषा विकास उपक्रमांतर्गत टॅलेंट हंट स्पर्धेचे नियोजन करण्यात आले. प्रथमतः तालुक्यातील सर्व शाळेत शाळा स्तरावर स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर केंद्रस्तरावर स्पर्धा झाली. केंद्रास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय इंग्रजी भाषा प्रतिभा शोध (Talent Hunt) दिनांक 22 नोव्हेंबर रोजी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जिंतूर येथे घेण्यात आली. स्पर्धेच्या सूत्रबद्ध आयोजनासाठी गटशिक्षणाधिकारी गणेशजी गांजरे यांनी स्पर्धा आयोजन समिती गठित केली. व्यवस्थितपणे जबाबदारी विभागून दिली. यामुळे स्पर्धेचे नियोजन व आयोजन उत्तम प्रकारे झाले.

स्वयंघोषित साईबाबांचे अवतार!

तालुकास्तरीय स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी स्वतः स्पर्धक विद्यार्थ्यांना प्रेरित केले. अमोल देशपांडे यांनी स्पर्धेचे स्वरूप, गुणदानाचे निकष याविषयी माहिती दिली. स्पर्धेसाठी तालुक्यातील इंग्रजी विषयातील तज्ञ शिक्षकांची परीक्षण समिती गठीत करण्यात आली. पूर्णतः पारदर्शक पद्धतीने आणि गुणदानाच्या सर्व निकषांचा विचार करून तालुकास्तरीय स्पर्धेत प्राथमिक व उच्च प्राथमिक गटात गुणानुक्रमे तीन स्पर्धकांची निवड करण्यात आली. केंद्रस्तरावर विजेते होऊन तालुकास्तरावर पात्र ठरलेल्या सर्वांना तसेच तालुकास्तरावर विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

प्राथमिक गटात प्रथम क्रमांक मुक्ता नागरे जि प प्रा शा कौडगाव, द्वितीय क्रमांक अस्मिता फंड जि प प्रा शा चांदज, तृतीय क्रमांक श्रुती कुरे जि प प्रा शा वडाळी तर उच्च प्राथमिक गटात प्रथम क्रमांक करुणा डागा जि प कन्या कें प्रा शा बोरी, द्वितीय क्रमांक अपूर्वा सांडवे जि प प्रा शा चांदज, तृतीय क्रमांक विभागून वैष्णवी चव्हाण जि प कें प्रा शा चारठाणा व ज्ञानेश्वरी अंभोरे जि प कन्या कें प्रा शा बोरी यांनी मिळवला. विजयी आणि सहभागी सर्व स्पर्धकांना आकर्षक प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

अब तेरा क्या होगा रे बुलडोजर!

स्पर्धा यशस्वीतेसाठी जिंतूर तालुक्याच्या शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखक, कवी मयूर जोशी तर आभार प्रदर्शन नालंदे सर यांनी केले.

गोवरचा विळखा वाढतोय….