राजगृह हल्ला प्रकरणाचा बेरोजगार, भुमिहीन मजुर व असंघटित कामगार संघाच्या वतीने निषेध

  65

  ✒️दोंडाईचा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  दोंडाईचा(दि-11जुलै):-डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून भ्याड हल्ल्याचा बेरोजगार, भुमिहीन मजुर व असंघटित कामगार संघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर दि 7 जुलै रोजी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

  राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.
  विद्येच्या या पंढरी वर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहिर निषेध करुन आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्वरीत अटक करुन कडक शासन करण्यात यावे.

  अशी मागणी बेरोजगार भुमिहीन मजुर व असंघटित कामगार संघाचे धुळे जिल्हा युवा अध्यक्ष नवनित बागले यांनी अप्पर  अप्पर तहसिलदार साहेब यांचे मार्फत शासनाकडे केली सदर मागणीस भारतीय बौध्द महासभा शिंदखेडा ता. अध्यक्ष दिपक सोनवणे.राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग दोंडाईचा शहर अध्यक्ष दादाभाई कापुरे विविध संघटनेचे जाहिर पाठींबा दिला.संविधान लिहिणाऱ्या महामानवाचा जगभर आदर्श   कर्तृत्वाचा आदर केला जात असताना त्यांच्या ग्रंथालयावर हल्ला करणे हि बाब पुरोगामी महाराष्ट्राला निश्चितच लाजिरवाणी आहे अशी खंत व्यक्त केली.