राज्यस्तरीय युवा संसदेत अनुप कोहळे, संतोषी सूत्रपवार यांची उपस्थिती

🔸मुंबई येथे राज्यपालांच्या उपस्थितीत पार पडली संसद

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.24नोव्हेंबर):- लोकशाही प्रक्रिया अधिक मजबूत व्हावी व युवकांचा कल राजकारणात वाढावा येणाऱ्या काळात, देशात सुसंस्कृत युवा तरुण राजकारणी तयार व्हावे या हेतूने नेहरू युवा केंद्र व युनिसेफ महाराष्ट्र च्या वतीने राज्यस्तरीय युवा संसदेचे आयोजन करण्यात आले होते. या संसदेत महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातून प्रत्येकी दोन प्रमाणे 72 प्रतिनिधी ची निवड करण्यात आली. या अधिवेशनात गडचिरोली जिल्ह्यातून अनुप कोहळे आणि संतोषी सूत्रपार यांनी प्रतिनिधित्व केले या अधिवेशनादरम्यान अनुप कोहळे यांनी पेयजल व स्वच्छता मंत्री म्हणून तर संतोशी सूत्रपवार ह्यानी विरोधी पक्षातील खासदार म्हणून भूमिका बजावली.

मुंबई येथे पार पडलेल्या दोन दिवशीय अधिवेशनादरम्यान सत्राच्या पहिल्या दिवशी सर्व प्रतिनिधींना विधान भवनातील विधानसभा, विधान परिषद, सेंट्रल हॉल दाखवून त्या ठिकाणी चालणाऱ्या सर्व कामकाजाची सविस्तर माहिती देण्यात आली. सोबतच राज्यपालाचे निवासस्थान, राजभवन दाखवून त्यामार्फत चालणाऱ्या राज्यकारभाराचीही माहिती देण्यात आली.

तर सत्राच्या दुसऱ्या दिवशी मुंबई विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये राज्यपालांच्या उपस्थितीत युवा संसद पार पडली. सुरुवातीला सर्व मंत्री व सदस्यांना सामूहिक शपथ देण्यात आली. त्यामध्ये प्रधानमंत्री, लोकसभा अध्यक्ष, विरोधी पक्ष नेते सह 22 मंत्री आणि इतर युवकांनी खासदार म्हणून भूमिका बजावत आपल्या क्षेत्रातील व राज्य, देशपातळी वरील समस्यांना घेऊन प्रश्नकाळात सत्ताधारी व विरोधक खासदारांनी प्रश्न विचारले यावर संबंधित मंत्र्यांनी सकारात्मक उत्तरे दिली.

अब तेरा क्या होगा रे बुलडोजर!

यादरम्यान प्राचीन जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासंदर्भात पेयजल व पर्यावरण मंत्रालयाच्या वतीने विधेयक सभागृहात मांडण्यात आले व बहुमताने ते पारित झाले. तर गृह मंत्रालयाच्या वतीने एका व्यक्तीस जास्तीत जास्त सहा वेळ पर्यंत खासदार म्हणून कार्य करता येईल या संदर्भात विधेयक मांडण्यात आले.

अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड!

गडचिरोली सारख्या अतिदुर्गम भागातील युवकांना प्रत्यक्ष विधान भवन व राजभवन पाहता आले. अभिरूप संसद च्या माध्यमातून संसदीय प्रणालीचा भाग बनून कार्य कर्ता आले, अशी अमूल्य संधी दिल्याबद्दल नेहरू युवा केंद्र व युनिसेफ महाराष्ट्र चे अनुप कोहळे आणि संतोषी सूत्रपवार यांनी आभार व्यक्त केले आहे.

गोवरचा विळखा वाढतोय….

गडचिरोली, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, लेख, शैक्षणिक, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED