छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्या बद्दल राज्यपाल कोश्यारी यांच्य‍ावर गुन्हा दाखल करण्याची छावा क्रांतीवीर सेनेची मागणी

33

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शातांराम दुनबळे)

नाशिक(दि.24नोव्हेंबर):- महाराष्ट् राज्याचे महामहिम
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शिवद्रोही असून छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे राष्ट्रपुरुष आहेत. कायद्यानुसार राष्ट्रपुरुषांची बदनामी अथवा त्यांच्याविषयीचा चुकीच बोलून ते पसरवण्याचे कृत्य गुन्हा ठरतो त्या मुळे त्यांच्या वर गुन्हा दाखल होण्याबाबत छावा क्रांतीवीर सेना नाशिक तर्फे अंबड पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर कोल्हे साहेब यांना निवेदन देण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापाठीच्या पदवी प्रदान कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे आता जुने झाले, आजच्या काळातील आदर्श घ्यायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे. राज्याचे राज्यपाल हे सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह विधान करत आहे.अपमान जनक बोलणं संदर्भहीन बोलणं, वादग्रस्त बोलणं, हे राज्यपाल कोशारी यांचे एकूण व्यक्तिमत्व दिसते, यापूर्वी देखील राज्यपाल यांनी असंच अपमान जनक वक्तव्य केलेले आहेत.राज्यपाल कोशारी यांनी जे वक्तव्य केलेले आहे. ते छत्रपती शिवाजी राजांचा अवमान करणारे वक्तव्य आहे.कोश्यारी हे महाराष्ट्रद्रोही माणूस असून महाराष्ट्रातला त्यांची नवीन वाचाळवीर म्हणून लवकरच नोंद होईल असे या वरून दिसत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे भविष्यकाळ, वर्तमान काळ, भूतकाळ, या तिन्ही काळाला प्रेरणा देणार असे व्यक्तिमत्त्व आहे. ते कधीही कालबाह्य होणारे व्यक्तिमत्त्व नाही. एक वेळेस कोश्यारी काळ कालबाह्य होतील. इतिहास जमा होतील. शिवाजी महाराज कधीही कालबाह्य होणार नाहीत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. त्यांच्या वर कायद्यानुसार राष्ट्रपुरुषांची बदनामी अथवा त्यांच्याविषयीचा चुकीचा इतिहास पसरवण्याचे कृत्य केल्यामुळे त्यांच्या वर गुन्हा करावा या बाबत छावा क्रांतीवीर सेना नाशिक तर्फे संस्थापक करण गायकर यांच्या मार्ग दर्षणाखाली निवेदन देण्यात आले.या वेळी छावा क्रांतीवीर सेना नाशिक जिल्हा अध्यक्ष आशिष हिरे, प्रदेश संघटक नितिन दातिर,नाशिक शहर अध्यक्ष योगेश गांगुर्डे,कामगार आघाडी जिल्हा अध्यश दिनेश नरवडे,शुभम महाले,अर्जुन शिरसाठ,मदन गाडे,बंटी पाबळे, अर्जुन पाटील, धैर्यशील पाटील, दीपक खताळे सह पदा धिकारी उपस्थित होते.

https://www.purogamiekta.in/2022/11/24/55834/