✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि-11जुलै):-विदर्भ राज्य आंदोलन समितीने जाहीर केल्या प्रमाणे दिनांक 10 जुलै रोजी चंद्रपूर येथील कार्यकारी अभियंता म. रा. वि. वि. म. विभाग चंद्रपुर च्या कार्यालयात जाऊन समितीच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी निवेदन देत वीजबिल वापस करून आंदोलन केले.

यावेळी लॉकडॉऊन काळातील वीज बिल माफ करावे,शेतकऱ्यांना पूर्ण वेळ पूर्ण दाबाची वीज देण्यात यावी,मागेल त्याला वीज कनेक्शन देण्यात यावे,विदर्भातील जनतेला 200 युनिटपर्यंत वीज बिल माफ करावे व त्यानंतरच्या युनिट साठी दर निम्मे करावे,शेतीपंपाचे बिल संपवण्यात यावे या प्रमुख मागण्यासाठी आलेले वीज बिल वापस करून आंदोलन करण्यात आले.
विदर्भ राज्य आंदोलन समिती चंद्रपुर चे जिल्हा अध्यक्ष किशोर पोतनवार , विभागाचे सचिव मितीन भागवत , कोर कमेटी सदस्य हिराचंद बोरकुटे ,अंकुश वाघमारे , तालुकाध्यक्ष दिवाकर माणुसमारे , शहराध्यक्ष अनिल डिकोडवार , किशोर दहेकर , गोपी मित्रा , बिरेंद्र विश्वास , सौ पापिता जुनघरे , सौ इंदू डोंगरे , सौ सानिध्या बांबोडे , सौ सविता पारशिवे , सौ कल्पना अलोने , सौ प्रगती भोसले , सौ तनुजा वाडके , सौ वंदना गेडाम , फुलूरी राजेशम , दिवाकर पेंदाम , रवींद्र रायपुरे , याकूब मुल्ला , दिलीप माणुसमारे , भास्कर गहुकर , बंडू माणुसमारे , हंसराज वनकर , धीरज वानखेडे गोविंद कडुकर विमल शाहा , सोनू निखडे , शिवकुमार मंडल , सचिन बावणे , गोपी भाणारकर , स्वप्नील नरुले , पुडलिक गोटे , सुरज गावंडे , राजू काळे , सह जिल्ह्यातील व शहरातील पदाधिकारी व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

चंद्रपूर, महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED