तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत महात्मा फुले हायस्कूल चे विद्यार्थ्यांचे घवघवीत यश !

26

🔹ऋषिकेश भोई – गोळाफेक स्पर्धेत प्रथम

🔸अर्पण जाधव – भालाफेक स्पर्धेत प्रथम

🔹प्रविण सोनवणे – २०० मीटर धावणे स्पर्धेत प्रथम

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.24नोव्हेंबर):- लिटील ब्लॉझम स्कूल येथे जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय व पंचायत समिती शिक्षण विभाग धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत तालुक्यातील १८ शाळा व महाविद्यालये यांनी सहभाग घेतला होता.

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेचे प्रास्ताविक लिटील ब्लॉझम स्कूल चे क्रिडाशिक्षक पवन बारी यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणुन लिटल ब्लॉझम संस्थेचे अध्यक्ष – आबासहेब दिपक जाधव, संस्थेच्या सचिव – सौ.ज्योती जाधव मॅडम, तालुका क्रिडा आधिकारी – मा. गुरुदत्त चव्हाण साहेब, तालुका समन्वयक – सचिन सूर्यवंशी सर उपस्थित होते.

सदर स्पर्धेत महात्मा फुले हायस्कूलचे १७ वर्षे आतील विद्यार्थी – १) ऋषिकेश तुळशिराम भोई – गोळाफेक स्पर्धेत २) अर्पण गिदोन जाधव – भालाफेक स्पर्धेत ३ ) प्रविण सुभाष सोनवणे – २०० मीटर धावणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.

स्वयंघोषित साईबाबांचे अवतार!

 

सावरकर का नाम बदल दो, विनायक से वीर कर दो!

स्पर्धेत विजय विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी अभिनंदन व कौतुक केले. या उत्तंग यशाबद्दल विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक जे.एस.पवार, पर्यवेक्षक एम.बी.मोरे व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. या विद्यार्थ्यांना क्रिडा शिक्षक एच.डी.माळी सर यांचे मार्गदर्शन लाभले.

अब तेरा क्या होगा रे बुलडोजर!