अ.भा.मुस्लिम मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक अब्दुल कादर मुकादम यांची निवड

✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मुंबई(दि.25नोव्हेंबर):- अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचे वतीने नाशिक शहरात दि .२८ व २९ जानेवारी २०२३ रोजी ९ वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन होणार असून त्या संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध विचारवंत,ज्येष्ठ साहित्यिक अब्दुल कादर मुकादम यांची निवड करण्यात आली असल्याचे परिषदेतर्फे हसीब नदाफ आणि डॉ.युसूफ बेन्नूर यांनी आज मुंबई येथील पत्रकार परिषदेत जाहीर केले.या संमेलनाची नाशिक शहरात व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तयारी सुरू होऊन असून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील किमान १००० साहित्यिक उपस्थित राहतील असा विश्वास कामगार नेते शेख ईरफान रशिद यांनी व्यक्त केला. तसेच संम्मेलनाचे ठिकाण नाशिक मधील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभा नगर , मुंबई नाका नाशिक येथे आयोजित करण्यात आलेले आहे.

अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय निवड समितीने महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक तथा ज्येष्ठविचारवंत,अब्दुल कादर मुकादम यांची केंद्रीय कार्यकारिणीच्या सभेत सर्वानुमते ९ वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनासाच्या अध्यक्षपदी निवड केली आहे.अब्दुल कादर मुकादम यांचा जन्म १४ जून १९३० रोजी रायगड जिल्ह्यातील रेवदंडा या नलहान खेड्या गांवात झाला. त्यानी पदवीचे शिक्षण मुंबई येथील महाविद्यालयांतून पुर्ण केले आहे,आणि पदव्युत्तर शिक्षण हे पुणे विद्यापीठातून घेतलेले आहे . त्यांनी मुंबई मराठी साहित्य संघाचे साहित्य विशारद म्हणून अत्यंत यशस्वीपणे कार्य केले.त्यांनी व्यावसायिक मराठी पत्रव्यवहारात विशेष प्राविण्यता प्राप्त केलेली आहे.

१९४२ साली राष्ट्र सेवादलात ते सामील झाले त्या नंतर त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीतील त्यांचा क्रियाशील सहभाग नोंदविला.त्यांचे दास्तान भारतीय मुसलमानांची ,चंद्र कोरीच्या छायेत व ईस्लाम ज्ञात आणि अज्ञात असे तीन ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत.नाशिक येथील साहित्य संमेलनात पुढील विषयावर वैचारिक मंथन होणार आहे.

१) स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत मुस्लिम: प्रश्न, वास्तव आणि अपेक्षा
२ मुस्लिम मराठी साहित्य चळवळीची तीन दशके : एक साहित्यिक, सांस्कृतिक व सामाजिक विश्लेषण
३) आम्ही भारताचे लोक भारताचे लोक
४) सांस्कृतिक दहशतवाद
५) मुस्लिम मराठी साहित्याचा प्रवाह आणि नवी दिशा
६) दोन कवी संमेलन घेणार येणार असुन त्यात फातिमाबीच्या लेकींचे कवि संम्मेलन व लहाण मुलांसाठी चित्रकला स्पर्धा , नाट्यस्पर्धा आयोजन करण्यात आलेले आहे.

९ वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, पथनाट्य (येवले येथील) व समाज प्रबोधनाचे गीते इ. चा देखील संम्मेलनात समावेश असणार आहेत. संम्मेलनामध्ये निसर्गावर आधारीत रियाज काझी यांचे पोष्टर प्रदर्शने असणार आहेत
यावेळी पुस्तक प्रदर्शन सुद्धा भरवण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ साहित्यिक तथा गझलकार डॉ.अजिज नदाफ आणि संमेलनाध्यक्ष अब्दुल कादर मुकादम यांची प्रकट मुलाखत होणार आहेत. याच संमेलनात एका जेष्ठ साहित्यिकांस जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.यापूर्वी महाराष्ट्रात स़पन्न झालेल्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या सर्व संमेलनाध्यक्षानां सन्मानपूर्वक आमंत्रण देवून त्या़चा यथायोग्य सत्कार करण्यात येणार आहे.

९ वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी साठी स्वागताध्यक्ष शेख इरफान रशिद ,हसीब नदाफ,सर्फराज शेख,अय्युब नल्लामंदु, मुबारक शेख,डॉ. युसुफ बेन्नूर, डॉ. ई.जा.तांबोळी,डॉ.शकील शेख प्राचार्य डॉ.फारूक शेख, डॉ. लियाकत नमोले,अरुण घोडेराव,सुरैय्या जहागीरदार,मझहर अल्लोळी, हसन मुजावर,शशांक हिरे, डॉ.रामदास भोंग,शेख मुस्तफा,कलिम अजि़ज,प्रा. शरद शेजावळ यांच्यासह असंख्य साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

आबादी की चिंता की आड़ में सांप्रदायिक राजनीति!

संविधान दिवस म्हणजे लोकशाहीचा उत्सव

चला भारतीय संविधान समजून घेवूया!

महाराष्ट्र, मुंबई, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED