महात्मा फुले हायस्कूल मध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा

60

🔹निबंध, सुंदर हस्ताक्षर, वकृत्व व रंगभरण स्पर्धेचे आयोजन

🔸सौ.एम.के.कापडणे यांच्याकडून शाळेला संविधान दिनी ” भारतीय संविधान ” भेट !…

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.26नोव्हेंबर):– शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेत संविधान दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. संविधान दिनाचे प्रास्ताविक शाळेतील आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार सर होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व ज्येष्ठ शिक्षिका सौ. पी.आर.सोनवणे व सौ.एम.के.कापडणे यांच्या शुभहस्ते भारतीय संविधान व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.सर्वप्रथम सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन. कोळी यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. संविधान दिनाचे औचित्य साधून आठवीतील चेतना जावरे व कोमल भोई यांनी मनोगत व्यक्त केले. शाळेतील उपशिक्षक व्ही.टी. माळी यांनी भारतीय संविधानाचा इतिहास, मूलभूत अधिकार व कर्तव्य याची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली.

शाळेतील उपशिक्षक एस.व्ही.आढावे यांनी 26 – 11 मुंबईतील आतंकवादी हल्ल्यात निरपराध भारतीय नागरीक व पोलिस ऑफिसर यांना वीरमरण आले. या सर्वांनी आपल्या जीवाची परवा न करता देशाचे संरक्षण केले. सर्व वीर जवानांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.

संविधान दिनाचे औचित्य साधत शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ.एम.के कापडणे यांनी शाळेच्या ग्रंथालयाला ” भारतीय संविधान ” हा अनमोल ग्रंथ भेट दिला. 200 मीटर रनिंग मध्ये आलेला तालुकास्तरावर विजयी विद्यार्थी प्रवीण सोनवणे याला मुख्याध्यापकांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते संविधान दिनाचे औचित्य साधून निबंध, सुंदर हस्ताक्षर, वकृत्व व रंगभरण स्पर्धेचे प्रथम द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना महापुरुषांचे ग्रंथ व लेखणी भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी संविधानाचे महत्त्व सांगून मुलांना संविधानावर चालण्याचा प्रयत्न करा. संविधान आपला आत्मा आहे असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी.डी.पाटील व आभार एच.डी.माळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले. शेवटी सर्व वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

विरोधकांनो, स्वत:ला नपुंसक घोषित करा !