जि.प.मा.शाळा, धोंडराई शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा

43

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.२६ नोव्हेंबर):- हा संविधान दिन जि.प.मा.शाळा, धोंडराई शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान ग्रंथाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. संविधानाच्या उद्देशिकेचे प्रकट वाचन करून यावेळी सर्वांनी शपथ घेतली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक धर्मराज करपे यांनी केले. कोमल जगधने, सिद्धी खरात, निशा सोनवणे या विद्यार्थीनींनी आपली सुंदर मनोगते व्यक्त केली.

संविधान दिनानिमित्त प्रशालेत संविधान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पुस्तक भेट देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच संविधान दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेऊन प्रभावी मांडणी केल्याबद्दल कोमल मोहन जगधने व सिद्धी सुखदेव खरात या विद्यार्थीनींचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक गणेश शहाणे तर प्रमुख उपस्थिती म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भागवत टेकाळे, लहू चव्हाण , विष्णू जाधव , नितीन माळी सर, अरुण खरात सर यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश खरात सर तर आभारप्रदर्शन जालिंदर ठवरे सर यांनी केले.

यावेळी शाळेतील शिक्षकवृंद सर्वश्री साहेबराव बरकते , संजय पांढरे , संतोष कोठेकर , प्रेम सिडाम , नितीन ढाकणे उपस्थित होते.